पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, 2 तर लोक सांगायचे नाहीत. रोग वाढल्यावर चेहऱ्यावर, हातावर, पायावर त्याची लक्षणं दिसू लागायची. हाताची व पायाची बोटं झिजायची. याचा कामावर परिणाम व्हायचा. लोकांच्या मनात त्या व्यक्तीविषयी घृणा, तिरस्कार वाटू लागायचा. न्हावी केस कापायला तयार व्हायचा नाही, लोक लग्नसमारंभाला बोलवेनासे व्हायचे, काळजी पडायची की आपल्या भावाबहिणींची लग्नं कशी होणार? जोडीदार त्यांना सोडून जायचे. काहींना त्यांच्या घरचे घर सोडून जायला सांगायचे. घरदार सोडून कुठं जायचं? कसं राहायचं? काय करायचं? आपल्या नशिबाला कोसायचे. आता औषधांमुळे, त्वरित उपचार केल्याने कुष्ठरोग नियंत्रणास खूप मदत झाली आहे. कुष्ठरोग हा 'मायकोबॅक्टेरियम लेने' या जिवाणूमुळे होतो. जिवाणूंची लागण झाल्यावर, त्याचे कोणते व किती परिणाम होतात हे त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारकशक्तीवर अवलंबून असतं. कुष्ठरोगाची लागण मुख्यतः पाच वर्गात विभागली जाते- कुष्ठरोगाचे प्रकार TT TB BB BL LL ट्यूबरक्यूलर-ट्यूबरक्यूलर (TT), ट्यूबरक्यूलर-बॉर्डरलाईन (TB), बॉर्डरलाईन-बॉर्डरलाईन (BE), बॉर्डरलाईन-लेप्रोमॅटस (BL), लेप्रोमॅटस लेप्रे (LL). कुष्ठरोग झाल्यावर रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर तो सहसा (TT) किंवा (TB) च्या अवस्थेत राहतो, पण रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर तो रोग जास्त वाढतो (BE, BL, LL वर्ग). कुष्ठरोग झालेल्या काही पुरुषांच्या पुरुषबीज निर्मितीवर, टेस्टोस्टेरोन निर्मितीवर, विपरीत परिणाम होतो व या वर्गात त्या रोगाचे जास्त परिणाम दिसतात. BB, BL, LL या वर्गात बसणाऱ्या काही स्त्रियांचं मासिक पाळीचं चक्र बिघडू शकतं असा तर्क एका अभ्यासातून व्यक्त केला गेला आहे. लैंगिक अडचणी या फक्त रोगामुळेच येतात असं नाही. अशा व्यक्तींना सातत्यानं समाजाच्या तिरस्काराला सामोरं जावं लागतं. त्यामुळे अनेकांची अस्मिता रसातळाला गेलेली असते. याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य खूप खालावतं. त्यामुळे मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १२३