पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विकलांगता व लैंगिकता 'द पर्सन्स विथ डिसेबिलीटी अॅक्ट, १९९५' मध्ये सात प्रकारच्या अपंगत्वाचे उल्लेख आहेत. (१) पूर्णपणे अंध (२) खूप थोडी दृष्टी असलेले (३) कुष्ठरोगातून बरे झालेले (४) कर्णबधिर (५) हाता-पायाचे अपंगत्व असलेले (उदा. आजाराने अपंगत्व आलेले, पोलिओमुळे विकलांग झालेले किंवा अपघातात हात-पाय गमावलेले इत्यादी) (६) मतिमंद (७) मानसिक आजारी (उदा. स्कित्झोफ्रेनिया). या व्यतिरिक्त 'द नॅशनल ट्रस्ट अॅक्ट १९९५' मध्ये अजून चार गटांचा उल्लेख केलेला आहे. (१) अस्थमा (२) सेरेब्रल पॅलसी (३) खूप मतिमंद (ज्या व्यक्ती दुसऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून आहेत) (४) एकोपक्षा जास्त अपंगत्व असलेले (उदा. कर्णबधिर आणि अंध असणं, जसं हिंदी सिनेमा 'ब्लॅक' मध्ये दाखवलं आहे). मूल जन्मापासून विकलांग असेल तर काही पालक आपल्याला पाहिजे तसं मूल मिळालं नाही म्हणून मुलाकडे दुर्लक्ष करतात. हे मूल कायमचं आपल्यावर अवलंबून राहणार असेल तर मग याला शिकवून काय उपयोग आहे? असा विचार करतात. काही मोजकेच पालक आपलं मूल शिकावं, स्वत:च्या पायावर उभं राहावं यासाठी खूप परिश्रम घेतात. बहुतेक पालकांना आपल्या विकलांग मुलांना या विशिष्ट परिस्थितीत कसं वाढवायचं, हे कळत नाही. उदा. मूल अंध असेल तर चेहऱ्यावरचे भाव दिसत नसल्यामुळे बोलण्याचा अर्थ व चेहऱ्यावरचे भाव यांत विसंगती दिसू शकते. नजरेतून व्यक्त केलेल्या भावना, खुणा करून दिलेले संदेश, ज्या गोष्टी आपण अजाणतेपणे गृहीत धरतो, त्यांचा वापर अंध व्यक्तींबरोबर करता येत नाही. ज्या व्यक्ती कर्णबधिर असतात त्यांना खुणांची भाषा शिकवावी लागते. अपंग असलेल्या मुला/मुलींना समाजात वावरायची संधी कमी मिळते. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास कमी प्रमाणात होण्याची शक्यता असते. हळूहळू लहानाचं मोठं होताना आपल्या वेगळेपणामुळे अनेक मुलं इतरांपासून दूर जातात. पुण्याच्या 'भोजवानी अॅकॅडमी' शाळेच्या दिलमेहेर व निवेदिता या कॉन्सेलर 'स्पेशल' मुलांबद्दल बोलताना म्हणाल्या, “आमच्या शाळेत 'स्पेशल 7 ११४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख