पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अॅबिलिटीज्'च्या मुलांना प्रवेश देण्यास प्राधान्य दिलं जातं. कोणाला ऐकू कमी येतं, तर कोणामध्ये शारीरिक विकलांगता असते. वेगळेपण असणाऱ्यांना लहानपणी मुलं/मुली सांभाळून घेतात. पण जसजसे ते मोठे व्हायला लागतात तसतसं दिसतं की एका पातळीवर सगळेजण एकमेकांना सामावून घेत असले तरी काही पातळ्यांवर त्यांचे गट पडतात. 'स्पेशल अॅबिलिटीज्' च्या मुलांचा वेगळा गट बनतो. विशेषतः स्पेशल अॅबिलिटीज्' ची मुलं जर इतरांपेक्षा एक-दोन इयत्ता मागे असतील (जी शक्यता असते) तर हा फरक जास्त जाणवतो. वयाने आपल्या इतर वर्गमित्रांपेक्षा मोठी असतात व त्यामुळे हा 'डिसकनेक्ट' जास्तच वाढतो. ती 'सीनियर' मुलांमध्ये जास्त रमतात. पण इथेही सगळे 'सीनियर्स' त्यांना सामावून घेतीलच असं नसतं. तसं झालं, की त्यांचा इतरांशी संवाद कमी होत जातो. इतरांबरोबर मिसळणं कमी होतं.' तारुण्यात पदार्पण केल्यावर मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिक वेगळेपणामुळे लैंगिक ज्ञान, लैंगिक नाती, लैंगिक अनुभव या सर्व पैलूंवर विकलांगतेनुसार प्रभाव पडतो. प्रत्येकाच्या विकलांगतेच्या वैशिष्ट्यामुळे प्रत्येकाच्या समोर प्रश्नांचे विविध पैलू येतात. मतिमंद मूल असेल तर त्याला लैंगिक पैलू समजण्याची प्रगल्भता नसते, कर्णबधिर व्यक्ती असेल तर संवादास अडचण येते, अंध असेल तर खाजगी व सार्वजनिक यातील फरक कळण्यास अडचण येते व कुष्ठरोग संसर्गित व्यक्ती असेल तर समाजाच्या तिरस्काराला सामोरं जावं लागतं. " मतिमंदता मतिमंद मुलांची वैचारिक व बौद्धिक क्षमता कमी असल्यामुळे त्यांना शिकवलेलं किती आत्मसात करता येईल याच्यावर मर्यादा येतात. काहीजणं कमी प्रमाणात मतिमंद असतात (माईल्ड रिटार्डेशन). अशांना दैनंदिन जीवनशैलीतील बहुसंख्य गोष्टी हळूहळू शिकता येतात. काही प्रमाणात मतिमंद असलेल्यांना (मॉडरेट रिटार्डेशन) दैनंदिन जीवनशैलीशी निगडित काही मोजक्या गोष्टी आत्मसात करता येतात. खूप मतिमंद (सिव्हीयर रिटार्डेशन) व्यक्ती मात्र जवळपास सर्व बाबतीत इतरांवर अवलंबून राहतात. मूल खूप मतिमंद असेल, तर लहान असताना पालकांना एवढा (तुलनात्मक) त्रास होत नाही कारण लहानपणी सर्वचं मुलं पालकांवर अवलंबून असतात, पण हळूहळू जसजसं वय वाढू लागतं तसतसं पालकांवर मोठं दडपण येतं. अशा मुलांना वाढवताना आईवडिलांच्या नात्यावर खूप ताण पडतो. काहींची लग्न मोडण्याच्या बेताला येतात. या ताणामुळे काहींना अशा मुलांना वाढवायची जबाबदारी नको मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख ११५