पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असतात कारण त्या बाळाचा लिंगभाव दोघांनाही माहीत नसतो. शस्त्रक्रिया करून मुलासारखी किंवा मुलीसारखी बायरचना केली पण मूल मोठं होताना लक्षात आलं की त्या मुलाचा लिंगभाव विरुद्ध लिंगाचा आहे तर मग काय करणार? म्हणून काहीजणांचं म्हणणं असतं की, ज्या कारणांनी जिवाला धोका असेल, वेदना होत असेल ती दूर करण्यापुरतीच/तेवढीच शस्त्रक्रिया करावी. बाळाला वाढवताना त्याला मुलगा किंवा मुलगी काहीही मानून प्रेमाने वाढवावं. ते मूल मोठं होताना स्वत:ला मुलगी म्हणायला लागली, तर ती मुलगी आहे असं समजावं. ते मूल स्वत:ला मुलगा मानायला लागलं, तर त्याला मुलगा समजावं. बाळाला वाढवताना त्याला स्वत:बद्दल काय वाटतंय हे समजून घ्यावं. बाळाला सक्तीनं किंवा दडपणाखाली मुलगा म्हणून वाग किंवा मुलगी म्हणून वाग असा हट्ट करू नका (अशाने त्या मुलाचा लिंगभाव घडत नाही), हळूहळू त्याला जसजशी समज येईल तसतसं त्याच्या वागण्यावरून त्याचा लिंगभाव काय आहे हे कळेल. तो/ती प्रौढ झाल्यावर त्या व्यक्तीने या विषयावर काम करणाऱ्या संस्थांकडून संपूर्ण माहिती मिळवावी. कॉन्सेलिंग, मानसोपचारतज्ज्ञ, प्लॅस्टिक सर्जन, एन्डॉक्रिनॉलॉजिस्ट यांच्याशी संवाद करून शस्त्रक्रिया करायची की नाही हा निर्णय घ्यावा. शस्त्रक्रियेसाठी त्या व्यक्तीवर कोणतीही सक्ती केली जाऊ नये, दबाव आणला जाऊ नये. शक्यता आहे, की ती व्यक्ती कोणतीही शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेईल. अशा निर्णयात काहीही गैर नाही. चुकीचं नाही. > जीवनशैली अशा व्यक्तींना समाजात वावरताना सर्वांत मोठी अडचण येते ती म्हणजे समाज फक्त दोनच लिंगात विभागलेला आहे पुरुष व स्त्री. वैदयकीय/कायदेशीर व्याख्येत एखादी व्यक्ती बसत नसेल, तर समाजात वावरताना समाजातील असहिष्णुतेमुळे त्या व्यक्तींवर खूप अन्याय होतो. माझ्या एका माहितीच्या व्यक्तीनं एका कॉलेजमध्ये प्रवेश घेताना ती कोण आहे हे सांगितल्यावर त्या संस्थेत तिला प्रवेश दयायचा की नाही यावर थोडी चर्चा झाली. एक मत होतं की तिला प्रवेश दिला जाऊ नये तर काहींचं मत होतं की ती शिकत आहे, तर आपण तिच्या प्रयत्नांना हातभार लावला पाहिजे. आनंदाची गोष्ट ही की तिला प्रवेश मिळाला. अशा व्यक्तींनी आपलं वेगळेपण लोकांना सांगावं का? हा मोठा प्रश्न असतो. पावलोपावली समाजाकडून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून बहुतेकजण आपलं वैविध्य लपवतात. सर्वांनाच आपलं वैविध्य लपवणं सोपं नसतं. छोट्या छोट्या ११२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख