पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही वेळा डॉक्टर 'कॅरयोटाईप' चाचणी करून (बाळाच्या पेशीमधील गुणसूत्रांची रचना तपासणे), संप्रेरकांची चाचणी करून (संप्रेरकांचं प्रमाण तपासून) वेगळेपणाच्या कारणाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात. लिंग घडवायची शस्त्रक्रिया (सेक्स असाइनमेंट सर्जरी) ज्या बाळाच्या जननेंद्रियांवरून तो मुलगा आहे की मुलगी आहे हे कळणं अवघड असतं अशा बाळाला मुलगा म्हणायचं की मुलगी म्हणायचं? याचं उत्तर अवघड आहे. काही वेळा अंदाजाने लिंग ठरवावं लागतं. हे ठरवण्यात स्त्री व पुरुष यांतील असमानता डोकावू शकते व तो मुलगा म्हणूनच वाढवू असा पालकांचा हट्ट असूशकतो. काही वेळा डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्या अर्भकाचा जननेंद्रियांवर शस्त्रक्रिया करून त्या अर्भकाची बाह्य जननेंद्रिय एका विशिष्ट लिंगाची बनवायचा प्रयत्न केला जातो. याला लिंग घडवण्याची शस्त्रक्रिया म्हणतात. अशी शस्त्रक्रिया करावी का? जर वेगळेपणामुळे बाळाचा जीव धोक्यात असेल, बाळाला त्रास होत असेल, तर शस्त्रक्रिया करावी लागते पण केवळ दिसण्यासाठी (समाजात स्वीकार व्हावा) म्हणून अशी शस्त्रक्रिया करायची का? काही डॉक्टरांचं म्हणणं असतं की अशी शस्त्रक्रिया लवकरात लवकर, मूल लहान असताना करावी. जर पालकांनी बाळाची अशी शस्त्रक्रिया करायची ठरवली तर या शस्त्रक्रियेच्या काय मर्यादा आहेत? ही शस्त्रक्रिया नाही केली तर काय अपाय होईल? किती उशिरानं शस्त्रक्रिया केली तर चालेल? शस्त्रक्रियेचे नजीकचे व दूरगामी (विशेषतः लैंगिक कार्यावर) काय परिणाम असू शकतात? शस्त्रक्रियेच्या अगोदर व शस्त्रक्रियेनंतर जननेंद्रियांच्या कार्यांची काय मर्यादा असणार याची पालकांनी नीट माहिती करून घ्यावी. काहीजणांचं म्हणणं असतं की, शस्त्रक्रिया करायची घाई करू नये. लहान असताना जननेंद्रियांच्या कार्यात लैंगिक पैलू आलेला नसतो. लहानपणी शस्त्रक्रिया केल्यावर, त्या शस्त्रक्रियेचे तारुण्यात आल्यावर लैंगिक कार्यावर काय परिणाम होतात हे कळत नाही. काही उदाहरणं समोर आहेत की लहान असताना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली व मोठं झाल्यावर त्या व्यक्तीला त्या शस्त्रक्रियेचे लैंगिक दुष्परिणाम आयुष्यभर सहन करावे लागत आहेत. दुसरं एक कारण असं, की ही शस्त्रक्रिया करायचा निर्णय घेण्यास (बाळाचा मुलगा करायचा की मुलगी करायची) आई-वडील व काही वेळा डॉक्टर असमर्थ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १११