पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाही. काही वेळा एखादया वैदयाकीय प्रश्नातून हे वेगळेपण लक्षात येतं. एक ताई म्हणाल्या,"१६ वर्षे झाली तरी पाळी आली नाही म्हणून मी डॉक्टरांकडे गेले. सोनोग्राफी केल्यावर मला कळलं की मला गर्भपिशवी नाहीये. मला खूप धक्का बसला. धक्का बसणं साहजिक आहे. कारण असं वेगळेपण असेल याची कल्पना नसते. कोणत्याच बाबतीत आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं जाणवलेलं नसतं. त्यामुळे असं आकस्मितपणे हे वेगळेपण कळल्यामुळे आपण एका क्षणात परके बनतो. मनात प्रत्येकक्षणी येतं की आता इतरांचं व आपलं आयुष्य वेगळं असणार आहे. इतरांची व आपली सुख-दुःखं एकच असतील ही कंफर्ट इन मेजॉरिटी' धारणा क्षणात नष्ट होते. आपल्यावर निसर्गानं अन्याय केला आहे असं वाटून नैराश्य येतं. आपल्याला गर्भाशय नाही हे जाणवल्यावर आपलं स्त्रीत्व कमी झाल्याची भावना मनात येऊ शकते. आपल्याला मूलं होणार नाही याचं दुःख होतं. गर्भाशयाचे विभाजन क्वचित वेळा गर्भाशयात नैसर्गिकदृष्ट्या विभाजन झालेलं असतं. याचा अर्थ गर्भाशयात दोन कप्पे पडतात. याच्यामुळे गर्भधारणेस अडचण येते. जरी गर्भधारणा झाली तरी गर्भाला वाढण्यास पुरेशी जागा मिळत नाही. याच्यामुळे गर्भ पडण्याची शक्यता वाढते. गर्भाशयाच्या वेगळेपणानुसार डॉक्टर विविध पर्याय सुचवतात. प्रजननसंस्थेमध्ये अत्यंत दुर्मीळ असलेलं वेगळेपण वरील सर्व उदाहरणं अशी आहेत की जिथं थोडं वेगळेपण असलं तरी बाळाचं लिंग ओळखण्यास अडचण येत नाही. पण काही बाळांच्या जननेंद्रियांमध्ये खूप वैविध्यं असतं, ज्याच्यामुळे त्याचं लिंग ठरवणं अवघड होतं. उदा. लिंगाचा अभाव व वृषणं असणं. अशा वेळी या बाळाला मुलगा म्हणायचं की मुलगी? असं मूल जन्माला आलं की पालकांना मोठा धक्का बसतो. वडिलांना आपण आपल्या पुरुषार्थात कमी पडलो असं वाटून न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. या वेगळेपणाला आपल्यालाच जबाबदार धरलं जाईल व आपला छळ होईल ही आईला भीती असते. आपल्या मुलाला आपल्यापासून दूर करतील का? ही काळजी असते. लोकांना कळलं तर त्यांचं कुतूहल, त्यांचे अनावश्यक सल्ले व त्यांचे शेरे ऐकून जीव मेटाकुटीला येतो. अशा वेगळेपणाला कोणाचाही दोष नसतो- मातेचा नाही, वडिलांचा नाही व त्या बाळाचाही नाही. निसर्गातील अनेक वैविध्यांमधील ही वैविध्यं आहेत. पालकांनी एकमेकांना आधार देणं व बाळाला प्रेमानं स्वीकारणं हाच योग्य मार्ग आहे. ११० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख