पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मूल रडतं. अशा वेळी अॅलोपथिक डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा. जर मूत्रमार्ग अरुंद असेल तर, शस्त्रक्रिया करून हा मार्ग मोठा करावा लागतो. मूत्रमार्ग मोठा केला, की लघवी करायला अडचण येत नाही. वयात आल्यावर मोठेपणी लैंगिक क्षमतेत कोणतीही बाधा येत नाही. प्रजननसंस्थेमध्ये क्वचित दिसणारे वेगळेपण हायपोस्पेडिया शिस्नमुंडाच्या टोकाला लघवी व वीर्य बाहेर सोडण्यासाठी छिद्र असतं. क्वचित वेळा हे छिद्र लिंगाच्या टोकाला नसून अलीकडे लिंगाच्या खालच्या भागाला असू शकतं. याला हायपोस्पेडिया' म्हणतात. हे छिद्र लिंगाच्या टोकापासून ते लिंगाच्या देठापर्यंतच्या भागात कुठेही असू शकतं. (जर मूत्रमार्गाचं छिद्र अगदी वृषणकोषाच्या शेजारीच असेल, तर मुलाला लघवी बसून करावी लागते.) याचबरोबर काहीजणांच्या लिंगाला बराच बाकही दिसतो. हे छिद्र कुठे आहे त्यावर हा बाक अवलंबून असतो. वीर्यनिर्मिती व पुरुषबीजनिर्मितीत कोणतीही अडचण नसते. या समस्येवर जाणकार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काहीजणांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. हे छिद्र बंद करून शिस्नमुंडापर्यंत मूत्रमार्ग वाढवून हे छिद्र शिस्नमुंडांच्या टोकाशी बनवलं जातं. एपीस्पेडिया काही वेळा मूत्रमार्गमुख लिंगाच्या वरच्या भागाला असू शकतं. याला 'एपीस्पेडिया' म्हणतात. या समस्येबरोबर काही वेळा लघवीवर नियंत्रण आणण्याच्या यंत्रणेत अडचण असू शकते. ही एपीस्पेडिया' ची समस्या गुंतागुंतीची असते व अत्यंत कुशल सर्जनची जरूरी लागते. क्लिटोरलमेगॅली क्वचित वेळा एखादया मुलीची शिस्निका सरासरी शिस्निकेच्या आकारापेक्षा जास्त मोठी असू शकते. याला 'क्लिटोरलमेगॅली' म्हणतात. याच्यामुळे लैंगिक सुखात कोणतीही बाधा येत नाही. गर्भाशयाचा अभाव जर आंतरिक प्रजनन रचना वेगळी असेल तर ती लक्षात येणं अवघड असतं. हे वेगळेपण खूप उशिरा लक्षात येऊ शकतं किंवा कधीकधी आयुष्यभर लक्षात येत मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १०९