पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घडणीत वेगळेपण येऊ शकतं. " जननेंद्रियांतील वेगळेपण जर वेगळेपणा सूक्ष्म असेल तर ते त्या व्यक्तीच्या व इतरांच्या ध्यानी येत नाही. जर बाह्य जननेंद्रियात लक्षात येईल असं वेगळेपण दिसलं तर तो इतरांसाठी कुतूहलाचा विषय बनतो. एकजण म्हणाल्या, ‘ए मला दाखव न्' म्हणून मला सारखं सतावलं जातं." सारखी चेष्टा, टवाळी केली जाते. म्हणून अशा व्यक्तींच्या मनात लहानपणापासून न्यूनगंड निर्माण होतो. याच्यामुळे काही झालं तरी हे वेगळेपण समाजाला कळता कामा नये अशी दृष्टी बनते. “कोणाला कळणार तर नाही?" अशी २४ तास काळजी लागून राहते. या विषयाबद्दल कोणापाशीही मोकळेपणाने बोलता येत नाही. भावनिक घुसमट होते. म्हणून लोकांनी संवेदनशीलता दाखवून अशा वैविध्यांबद्दल कुतूहल दाखवणं व त्रास देणं कटाक्षानं टाळावं. जननेंद्रियांतील काही वेगळेपण किरकोळ स्वरूपाचे असते तर काही मोठ्या स्वरूपाचे असते. काही थोड्या व्यक्तींमध्ये दिसतात, काही क्वचित दिसतात व काही अत्यंत दुर्मीळ आहेत. पुढे काही मोजक्या वैविध्यांबद्दल माहिती दिली आहे. • . थोड्या प्रमाणात दिसणारे प्रजनन संस्थेतील वेगळेपण वृषणकोषात न उतरलेले वृषण (क्रिप्टॉरचिडिजम) जन्माला आलेल्या काही मुलांमध्ये एक किंवा दोन्ही वृषण पोटातून खाली वृषणकोषात उतरलेली नाहीत असं दिसून येतं. कालांतराने एका वर्षात काही बाळांचे वृषण वृषणकोषात उतरतात. जर ती निसर्गतः खाली उतरतील म्हणून वर्षभर वाट बघायची ठरवली तरी या काळात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या मुलाची अधूनमधून तपासणी होणं आवश्यक आहे. जर या काळात वृषण वृषणकोषात उतरले नाहीत तर शस्त्रक्रिया करून ते खाली उतरवावे लागतात. तसं न केल्यास वयात आल्यावर त्या वृषणांमध्ये पुरुषबीजं निर्माण होत नाहीत. त्या वृषणात कर्करोग होण्याची शक्यता असते. 7 मियाटल स्टेनॉसिस काही लहान मुलांच्या शिस्नमुंडातील मूत्रमार्ग खूप अरुंद असतो व म्हणून लघवी करताना खूप त्रास होतो. लघवी थोडी थोडी व अडखळत होते. या त्रासामुळे १०८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख