पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कळलेली नाहीत. जी मोजकी कारणं कळलेली आहेत त्यात असं दिसतं की गुणसूत्रातील वेगळेपणामुळे, संप्रेरकांतील वेगळेपणामुळे किंवा गर्भारपणात काही विशिष्ट निषिद्ध असलेली औषधं घेतल्यामुळे अशी वैविध्यं दिसू शकतात. गुणसूत्र स्त्रीबीज व पुरुषबीजांची निर्मिती होताना गुणसूत्रांचं विभाजन योग्य प्रकारे व्हावं लागतं. स्त्रीबीज व पुरुषबीज फलित होताना त्यांचं मीलन योग्य प्रकारे व्हावं लागतं. (फलित बीजांत २३ गुणसूत्रांच्या जोड्या असाव्या लागतात), या प्रक्रियेत जर वेगळेपण आलं तर फलित बीजांतील गुणसूत्रांची संख्या अपेक्षित ४६ न होता वेगळी होते किंवा गुणसूत्रांची रचना ('क्रोमाझोम स्ट्रक्चर') बदलते. अशा वेळी खूप शक्यता असते की तो गर्भ वाढू शकणार नाही व गर्भ पडतो. काही वेळा गुणसूत्रांची मात्रा ४६ नसली तरी मूल जन्माला येतं. त्याच्यात शारीरिक किंवा मानसिक वेगळेपण असू शकतं. उदा.१ 'टर्नर सिंड्रोम'. हे वेगळेपण असलेल्या मुलींच्या गुणसूत्रांच्या २३व्या जोडीच्या ठिकाणी 'xx' ऐवजी एकच 'x' गुणसूत्र असतं. उदा.२. 'क्लीनफेल्टर सिंड्रोम'. हे वेगळेपण असलेल्या मुलांच्या गुणसूत्रांच्या २३व्या जोडीच्या ठिकाणी 'XY'ऐवजी 'xXY' असतात. जसं गुणसूत्रांच्या आकड्यात फरक असू शकतो तसंच त्यांच्या रचनेतही फरक असू शकतो. काही वेळा एखादया गुणसूत्राचा अर्धा भाग नसतो, म्हणजे गुणसूत्राच्या २३ जोड्या असल्या तरी एखादया जोडीत एक गुणसूत्र अर्ध असतं. संप्रेरक/स्त्राव आपल्या शरीरात काही ग्रंथी संप्रेरक निर्माण करतात. विशिष्ट संप्रेरक विशिष्ट कार्य करतात. शरीराची घडण, वाढ, लैंगिक इच्छा या सर्व गोष्टी विविध संप्रेरकांवर अवलंबून असतात. गर्भाची वाढ होताना योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य काळापुरते ठरावीक संप्रेरक गर्भात उपलब्ध व्हावे लागतात. गर्भाची वाढ होताना यातील विशिष्ट संप्रेरकांच्या निर्मितीत फरक पडला, त्यांच्या प्रमाणात/नियंत्रणात/कार्यपद्धतीत बदल झाला तर जननेंद्रियात वेगळेपण येऊ शकतं. उदा. १. 'CAH' (कॉनजनायटल अॅड्रेनल हायपरप्लेसिया). उदा.'AIS' (ॲड्रोजेन इनसेसिटीवीटी सिंड्रोम). 1 औषधं काही औषधं आहेत, जी गर्भधारणा झाल्यावर स्त्रीनं घ्यायची नसतात. जर अशी औषधं कळत-नकळत घेतली गेली तर गर्भाच्या वाढीत/जननेंद्रियांच्या मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १०७ ।