पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो. या त्रासामुळे तिला विश्रांतीची गरज वाटू शकते. त्रासामुळे तिचा मूड नसेल तर या काळात संभोग करू नये. पाळीच्यावेळी स्त्रीच्या योनीच्या आतल्या भागाला संरक्षण करणाऱ्या जिवाणूंचं संतुलन बिघडलेलं असतं. अशा वेळी जर निरोध न वापरता संभोग झाला व जर पुरुषाला एसटीआय/एचाआयव्ही/एड्स असेल तर त्याच्यापासून स्त्रीला एसटीआय/एचआयव्ही/एड्सची बाधा होण्याची शक्यता अनेक पटीनं वाढते. काहींना मासिक पाळीच्या वेळी योनीतून रक्त जात असताना त्यात लिंग घालून संभोग करायला घाण वाटतं, असं वाटत असेल तर या काळात संभोग करू नये. या गोष्टी विचारात घेऊन जर दोघांची तयारी असेल तर या काळात संभोग करायला काही हरकत नाही, पण संभोग करताना निरोधचा वापर करावा. गर्भधारणा आणि संभोग गर्भधारणा झाल्यावर स्त्रीला किती दिवस संभोग करता येतो? जर गर्भ पडल्याचा किंवा गर्भपाताचा इतिहास नसेल, तर सात महिन्यांपर्यंत लिंग-योनी मैथुन करण्यास काही हरकत नाही. या काळात स्त्रीला पुरुषापासून एसटीआय होऊ नये म्हणून संभोग करताना पुरुषाने निरोध वापरावा. स्त्रीचं पोट वाढलं की 'मिशनरी पोझिशन' मध्ये संभोग करण्याने तिच्या पोटावर पुरुषाचा भार पडू शकतो. म्हणून या काळात संभोग करताना 'वूमन ऑन टॉप पोझिशन' चा वापर करावा. सातव्या महिन्यानंतर लिंग-योनीमैथुन टाळावा. या काळात मुखमैथुन, एकमेकांनी हातांनी मैथुन करून जोडप्यानं लैंगिक सुख उपभोगण्यास काही हरकत नाही. जर अगोदर गर्भ पडण्याचा किंवा गर्भपाताचा इतिहास असेल तर गर्भधारणा झाल्यावर लिंग- योनीमैथुन व गुदमैथुन टाळावा.

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १०३ 1