पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जननेंद्रियांतील वेगळेपण "आमच्या नात्यातील एका मुलीला गर्भाशय नाही. असं असू शकतं का?" किंवा “लिंगाच्या टोकाऐवजी लिंगाच्या मध्ये छिद्र असू शकतं का?" अशा त-हेचे अनेक प्रश्न कार्यशाळेत विचारले जातात. विचारणाऱ्यांना जननेंद्रिय सोडून इतर अवयवातील वेगळेपण स्वीकारण्यास एवढी अडचण येत नाही. उदा. पाचाच्या ऐवजी सहा बोटं इत्यादी. पण त्यांना जननेंद्रियांमध्ये वेगळेपण असू शकतं हे स्वीकारायला खूप अवघड जातं. " > जननेंद्रियांची घडण कोणतं पुरुषबीज स्त्रीबीजाला फलित करतं यावर मुलगा होणार की मुलगी होणार हे अवलंबून असतं (बघा, सत्र-गर्भधारणा व प्रसूती). गर्भाची जननेंद्रियं सहाव्या आठवड्यापासून घडू लागतात. सुरुवातीला गर्भात 'गोनॅड्स', 'मूलेरियन' रचना व वुल्फियन' रचना असतात. मुलाच्या जननेंद्रियांची घडण होताना 'मूलेरियन' रचनेचा नाश होतो व 'वुल्फियन' रचनेचा विकास होतो. वुल्फियन रचनेपासून पुरुष बीजवाहिन्या, वीर्यकोष, पूरस्थ ग्रंथी तयार होतात. 'गोनॅड्स'चे वृषण बनतात व हे वृषण वृषणकोषात उतरतात. लिंगाची घडण होते. मुलीच्या जननेंद्रियांची घडण होताना 'वुल्फियन' रचनेचा बऱ्याच अंशी नाश होतो व मूलेरियन' रचनेचा विकास होतो. 'मूलेरियन' रचनेपासून स्त्रीबीजवाहिन्या, गर्भाशय तयार होतं. 'गोनॅड्स'ची स्त्रीबीजांड बनतात. शिस्निका व योनीची घडण होते. जननेंद्रियांच्या वेगळेपणाची कारणं काही गांमध्ये विविध कारणांमुळे जननेंद्रियांच्या या घडणीत वेगळेपण येऊ शकतं. काही वेळा अगदी सूक्ष्म स्वरूपात वेगळेपण असतं तर काही वेळा मोठ्या प्रमाणात वेगळेपण असतं. जननेंद्रियांच्या वेगळेपणाची सर्व कारणं अजून शास्त्राला १०४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख