पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ठेवतात. याच्यामुळे वीर्यपतनाच्या वेळी वीर्य मूत्राशयात जात नाही, लिंगातून बाहेर येतं. जर या स्नायूंमध्ये दोष असेल किंवा पूरस्थ ग्रंथीच्या शस्त्रक्रियेमुळे जर हे स्नायू कापले गेले, तर वीर्यपतनाच्या वेळी वीर्य लिंगातून बाहेर न येता ते मूत्राशयात जातं. वीर्य मूत्राशयात गेल्यामुळे कोणताही अपाय होत नाही, पुढच्या वेळी लघवी करताना वीर्य वाहून जातं. या समस्येमुळे गर्भधारणा होण्यास अडचण येते. धात सिंड्रोम काही वेळा पुरुषांना लघवी करताना लघवीत थोडा पांढरा पदार्थ दिसू शकतो. ज्या पुरुषांना कुंथून संडास किंवा लघवी करायची सवय असेल अशांमध्ये हा प्रकार दिसू शकतो. जेव्हा आपण खूप कुंथतो तेव्हा पूरस्थ ग्रंथी व वीर्यकोष यांच्या अवतीभोवतीचा भाग आवळला जातो व एक दोन वीर्याचे थेंब व पुरस्थ ग्रंथीचा स्त्राव लघवीवाटे येऊ शकतो. याला 'धात सिंड्रोम' म्हणतात. याच्यामुळे काहीही अपाय होत नाही. वैजिनीस्मस या समस्येत संभोगाच्या वेळी जेव्हा पुरुषाचं लिंग योनीत प्रवेश करतं त्यावेळी स्त्रीच्या जननेंद्रियांच्या जवळपासचे स्नायू एकदम आखडतात व जननेंद्रियांच्या अवतीभोवती कळ येते. याच्यामुळे संभोग आनंदमय न होता तो वेदनामय होतो. बहुतेक वेळा याची कारणं मानसिक स्वरूपाची असतात. संभोगाबद्दल भीती असणं, पूर्वी लैंगिक जबरदस्ती झाली असेल तर संभोगाच्या वेळी त्याची आठवण येणं अशा विविध कारणांमुळे हा त्रास होऊ शकतो. मानसेपचारतज्ज्ञांकडे जाऊन याच्यावर इलाज करता येतो. थेरपी व 'व्हजायनल डायलेटर' उपकरणाचा वापर करून ही समस्या सोडवायला मदत होते. जी स्पॉट (ग्रॅफियन स्पॉट) काही स्त्रियांच्या योनीच्या आतल्या बाजूला जास्त संवेदनशीलता देणारा भाग असू शकतो. योनीच्या इतर भागाच्या तुलनेत या भागाला लिंग-योनीमैथुन करताना लिंगाचं घर्षण झाल्याने जास्त सुख मिळतं. या भागाला 'जी स्पॉट' म्हणतात. असा भाग काही स्त्रियांमध्येच आढळला आहे. मासिक पाळी आणि संभोग मासिक पाळी चालू असताना संभोग करावा का? केला तर त्यानं काही अपाय होतो का? याचं उत्तर पुढील मुद्द्यांवर अवलंबून आहे. १०२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख