पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डबल निरोधाचा वापर निरोध वापरून संवेदनशीलता कमी होते म्हणून काहीजण डबल निरोध वापरून संभोगाचा कालावधी वाढवायचा प्रयत्न करून बघतात. अनेस्थेटिक जेली काहीजण संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी 'अॅनेस्थेटिक जेली (उदा. लायडोकेन २% जेली) लिंगाला लावून लिंग काही अंशी बधिर करून संभोग करतात. अनेस्थेटिक रसायनामुळे संभोगाचा कालावधी वाढू शकतो पण लिंगाची संवेदनशीलता कमी होते व संभोगातून कमी सुख मिळतं. अशा प्रकारचं रसायन निरोधाच्या वंगणात वापरून संभोगाचा कालावधी वाढवणारे निरोध बनवले जातात. या एक्स्ट्रा टाइम' निरोधाच्या वंगणात अशा त-हेचं अनेस्थेटिक रसायन मिसळलेलं असतं. मानसिक आजारांवरची औषधं क्लायंटचा संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी काही मानसोपचारतज्ज्ञ मानसिक आजारांवर वापरल्या जाणाऱ्या औषधांचा उपयोग करतात (उदा.SSRI). लवकर वीर्यपतन न होणं हा काही औषधांचा 'साईड इफेक्ट असतो. काहीजणांना याचा फायदा होतो.

वीर्यपतन दीर्घकाळ न होणं काही पुरुष खूप वेळ संभोग करतात तरी त्यांचं वीर्यपतन होत नाही. संभोग करून ते थकतात, जोडीदार घोरायला लागते तरी 'क्लायमॅक्स' चा पत्ता नसतो. जर दारू, नशा घेऊन संभोग केला तर हे होऊ शकतं. मेंदूत नशा चढल्यामुळे लिंगाला मिळणारे लैंगिक सुखाचे संदेश मेंदूला अनुभवण्यास अडचण येते. संभोगाचा कालावधी वाढतो, पण लैंगिक सुखाची अनुभूती कमी होते.

  • काही पुरुषांना जर चेता पेशींचे काही विशिष्ट आजार असतील तर त्यामुळे

संदेश यंत्रणेत अडथळा येतो व लैंगिक सुखाचा उच्चतम बिंदू अनुभवण्यास अडचण येते. रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन संभोग झाल्यावर वीर्यपतनाच्या वेळी वीर्य लिंगातून बाहेर येणं अपेक्षित असतं. काही पुरुषांच्या बाबतीत वीर्य लिंगातून बाहेर न येता ते मूत्राशयात जातं. हे असं का होतं? मूत्राशयाच्या खालच्या भागात काही स्नायू असतात. ते मूत्राशय मुख बंद मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १०१