पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- तर तिनं तिच्या योनिमुखाला लिंगाचा नुसता स्पर्श होईल असं बसायचं. मग हळूहळू लिंगाला योनीत घ्यायचा प्रयत्न करायचा. जर वीर्यपतन होतंय असं वाटलं तर पुरुषाने तिला थांब' म्हणून सांगायचं. त्याने तिला थांब' सांगितलं की तिनं तसंच बसून राहायचं. वीर्यपतनाची इच्छा गेली की परत लिंग हळूहळू योनीत घालायचा प्रयत्न करायचा. हळूहळू लिंगाला योनीच्या स्पर्शाची सवय व्हायला लागेल व पूर्ण लिंग योनीत गेलं तरी वीर्यपतन होणार नाही. पूर्ण लिंग योनीत गेल्यावर स्त्रीनं काही वेळ (१०-१५ मिनिटं) नुसतं लिंगाला योनीत ठेवून बसून राहायचं. तिनं किंवा जोडीदारानं हालचाल करायची नाही. लिंग शिथिल झालं तर परत लिंगाला उत्तेजना आणून परत हीच क्रिया करायची. असं दररोज झोपायच्या अगोदर तीन वेळा करायचं. हे एक आठवडा करायचं. हा सबंध आठवडा हस्तमैथुन/संभोगातून वीर्यपतन करायचं नाही. चौथा आठवडा - वरील टप्प्यात एक बदल करायचा. आता लिंगाला काही मिनिटं तरी योनीत राहून उत्तेजित राहायची सवय झालेली असते. आता लिंग योनीत घेतल्यावर स्त्रीनं हळूहळू खाली वर अशी हालचाल करायची. वीर्यपतन होतंय असं वाटलं तर पुरुषाने तिला 'थांब' सांगायचं. 'थांब' सांगितलं की तिनं तसंच लिंगावर बसून राहायचं. वीर्यपतनाची इच्छा गेली की पुरुषाने परत ‘सुरू' करण्यास सांगायचं. असं १० एक मिनिटं दररोज पुढचा एक आठवडा करायचं. या टप्प्यात पुरुषाचा संभोगाचा कालावधी वाढलेला दिसतो. पाचवा आठवडा - स्त्रीनं पाठीवर झोपायच. पुरुषाने उत्तेजित लिंग तिच्या योनीत हळूहळू घालायचं. जर वीर्यपतन होतंय असं वाटलं तर थांबायचं. वीर्यपतनाची इच्छा गेली की परत लिंग आत घालायचा प्रयत्न करायचा. पूर्ण लिंग योनीत गेलं की पुरुषाने हळूहळू एक 'स्ट्रोक' करायचा. जर वीर्यपतन होतंय असं वाटलं की पुरुषाने तसंच थांबायचं (लिंग योनीतच ठेवून). वीर्यपतनाची इच्छा गेली की परत हळूहळू स्ट्रोक' सुरू करायचे. . लक्षात ठेवण्याच्या गोष्टी १. सबुरी हवी. घाईघाईत पुढचा टप्पा गाठायचा प्रयत्न करू नका. २. काही वेळा एक टप्पा करताना अपयश येतं. याचा अर्थ पूर्वीच्या टप्प्यात अजून सुधारणा हवी. इथं दिलेला १ आठवडा' असा प्रत्येक टप्प्याचा कालावधी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो. ३. संभोगाचा कालावधी वाढला की काही महिने/वर्षांनतर काहीजणांचं परत लवकर वीर्यपतन सुरू होतं. अशा वेळी परत वरील टप्प्यांचा वापर करून संभोगाचा कालावधी वाढवायचा प्रयत्न करावा. १०० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख