पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शीघ्र वीर्यपतन एक ताई म्हणाल्या, “हे फिल्डींग लावतात. बॅटिंगला उभे राहतात व विकेट लगेच पडते." लैंगिक प्रश्नांमध्ये सर्वांत मोठा प्रश्न जो अनेक पुरुषांना भेडसावतो, तो म्हणजे शीघ्र वीर्यपतन. काहींना याची इतकी लाज वाटते की ते संभोग करायचं टाळतात. या प्रश्नामुळे पुरुषाचा आत्मविश्वास खूप कमी होतो. संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी खालील मार्गांचा वापर केला जातो. यातल्या स्टार्ट- स्टॉप' पद्धतीचा शास्त्रोक्त वापर करून अनेकांना चांगला फरक पडलेला दिसतो. 'स्टार्ट-स्टॉप' पद्धत लैंगिकतेवर काम करणाऱ्या मास्टर्स अंड जॉन्सन या डॉक्टरांनी हा मार्ग सुचवला आहे. त्यात थोडा बदल करून मी ती पद्धत इथे देत आहे. हा मार्ग सोपा असला तरी तो मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्यानं करावा. पहिल्या टप्प्यानंतर सर्व टप्प्यांसाठी जोडीदाराची गरज लागते. पहिला आठवडा - हस्तमैथुन करायला लागायचं पण वीर्यपतन होऊ दयायचं नाही. वीर्यपतन व्हायची वेळ आली की इतर कोणते तरी (आध्यात्मिक?) विचार करून लिंगाचा ताठरपणा घालवून यायचा. परत लैंगिक इच्छा आणून लिंग उत्तेजित करायचं व परत हीच प्रक्रिया करायची. असं दररोज झोपायच्या अगोदर तीन वेळा करायचं. हे एक आठवडा करायचं. हा सबंध आठवडा हस्तमैथुन करून किंवा संभोग करून वीर्यपतन करायचं नाही. या टप्प्यात हळूहळू पुरुषाने त्याच्या वीर्यपतनावरचं नियंत्रण सुटण्याचा बिंदू ओळखायला लागयचं. कोणत्या क्षणानंतर आपला संयम सुटणार हे त्याने व्यवस्थित ओळखायला शिकावं. दुसरा आठवडा - जोडीदाराने शीघ्रपतन होणाऱ्या व्यक्तीचं लिंग हातात घेऊन हस्तमैथुन करायला लागायचं. जसा नीर्यपतनाचा क्षण जवळ येईल, तसंतसं व्यक्तीनं वीर्यपतन होण्याच्या क्षणाकडे बारीक लक्ष दयायचं, तो क्षण जवळ आला असं वाटलं की लगेच त्या पुरुषानी 'थांब' असं जोडीदाराला सांगायचं. मन इतरत्र केंद्रित करायचं. लिंग शिथिल झालं की परत लैंगिक इच्छा आणून लिंग उत्तेजित करायचंव परत हीच प्रक्रिया करायची. असं दररोज संध्याकाळी झोपायच्या अगोदर तीन वेळा करायचं. हे एक आठवडा करायचं. हा सबंध आठवडा हस्तमैथुन/संभोगातून वीर्यपतन करायचं नाही. तिसरा आठवडा - पुरुषाने पाठीवर झोपायचं. लैंगिक उत्तेजना येऊन लिंग उत्तेजित झालं की स्त्रीनं वरती बसून त्याच्या लिंगाला आपल्या योनीचा स्पर्श करायचा. जर वीर्यपतन होतंय असं वाटलं तर तिनं उठायचं.जर वीर्यपतन झालं नाही मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख ९९