पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असा संभोग करावा, असा आग्रह करतात. प्रत्येक प्रकारच्या जनावराच्या जननेंद्रियांची रचना व आकार वेगवेगळे असतात; जनावराच्या मनःस्थितीचा अंदाज घेणं अवघड असतं. म्हणून जनावराबरोबर संभोग करताना माणसाला (विशेषतः स्वीकृत जोडीदाराला) मोठी इजा होण्याची शक्यता असते. 'फोन सेक्स' व 'इंटरनेट चॅटरूम सेक्स' 'फोन सेक्स' म्हणजे विशिष्ट फोन नंबरवर फोन करायचा व पलीकडच्या व्यक्तीशी लैंगिक उत्तेजना देणारा संवाद साधायचा. जेवढा वेळ तुम्ही बोलाल व सेवा पुरवणारी तुम्हांला फोनवर खिळवून ठेवेल तेवढे सेवा पुरवणारीला जास्त पैसे मिळतात. पूर्वी महाराष्ट्रात 'फोन सेक्स'ला बंदी नव्हती. आता महाराष्ट्र सरकारने याला बंदी घातली आहे. अनेकजण चॅटरूम्सवर एकमेकांना संभोगाची वर्णनं पाठवून लैंगिक उत्तेजना मिळवतात. इंटरनेटवरून जोडीदार शोधतात व आपण त्याच्या/तिच्याबरोबर कोणती प्रणयक्रीडा करू इच्छितो ही उत्तेजक वर्णनं एकमेकांना पाठवून लैंगिक सुख घेतलं जातं. 'फोन सेक्स' व 'चॅटरूम सेक्स' या दोन्ही प्रकारांमध्ये दोन व्यक्तींमध्ये अंतर असल्यामुळे यातून एसटीआय/एचआयव्ही/एड्स होण्याची कोणतीच शक्यता नसते. कायदा व अश्लील वाङ्मय/लैंगिक साधनं आपल्या देशात लैंगिक खेळणी, उपकरणं तयार करण्यास, विकण्यास कायदयानं मंजुरी नाही. ही सर्व खेळणी अश्लील वाङ्मयाखाली मोडत असल्यामुळे त्यांची निर्मिती करण भा.दं.सं. २९२ खाली गुन्हा आहे. (याला अपवाद जर एखादं उपकरण वैदयकीय कारणासाठी तयार केलं तर त्याला मान्यता आहे.) अश्लील वाङ्मय तयार करणं, विकणं भा.दं.सं. २९२ कलमानुसार गुन्हा आहे. २० वर्षाखालील मुला/मुलींना अश्लील वाङ्मय विकणं भा.दं.सं.२९३ नुसार गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीने अश्लील वाङ्मय खाजगीत बघणं, बाळगणं गुन्हा नाही, पण ते दुसऱ्यांना दाखवणं, देणं, विकणं, पाठवणं गुन्हा आहे. अश्लीलता ही 'सब्जेक्टिव्ह' आहे. कोणाला कशात सौंदर्य वाटेल व कोणाला कशात अश्लीलता दिसेल सांगता येत नाही. एखाद्याला मायकेल अँजेलोने घडवलेला 'डेव्हिड' चा नग्न पुतळा सुंदर वाटेल, तर दुसऱ्या एखाद्याला तोच पुतळा अश्लील वाटेल. म्हणून प्रश्न पडतो की अश्लील काय? नग्नता अश्लील मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख ९१