पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आवश्यक असतं. अशा सिनेमात काम करणाऱ्या पुरुषांची लिंग बहुतेक वेळा खूप मोठी असतात (अनेक वेळा अशी मोठी लिंग बघूनच व्यक्ती निवडलेली असते.). प्रत्यक्षात समाजामध्ये फार थोड्या पुरुषांची लिंग एवढी मोठी असतात. अशा मोठ्या लिंगाकडे बघून अनेक प्रेक्षकांचा गैरसमज होतो की आपलं लिंग लहान आहे. असा न्यूनगंड लैंगिक सुखास मारक ठरतो. आपण जोडीदाराला पुरेसं सुख देऊ शकणार नाही ही काळजी मनात घर करते. या काळजीमुळे लिंगाला ताठरपणा येण्यास अडचण येते व तसं झालं की मनाची खात्रीच होते की लिंग मोठं नाही म्हणून आपण जोडीदाराला सुख देऊ शकत नाही. उत्तेजित लिंगाची किमान किती लांबी असावी म्हणजे स्वीकृत जोडीदारास पूर्ण लैंगिक समाधान मिळेल? याचं उत्तर 'लैंगिक अनुभव' या सत्रात दिलं आहे. संभोगाचा कालावधी ब्ल्यू फिल्म्स्चं चित्रीकरण अनेक दिवस, आठवडे चाललेलं असतं. सगळं चित्रीकरण झाल्यावर तिचं एडिटींग करून ती फिल्म आपण ३० मिनिटांत बघतो. अनेक पुरुषांचा गैरसमज होतो की त्या सिनेमात संभोग करणाऱ्या पुरुषांचा स्टॅमिना ३० मिनिटांचा आहे, म्हणजे आपलाही स्टॅमिना ३० मिनिटांचा असला पाहिजे. चित्रीकरण करताना फिल्मचा एक शॉट व फिल्मचा दुसरा शॉट यांच्यात अनेक तासांचं किंवा दिवसांचं अंतर असतं. हे सगळं एकत्र करून एकामागोमाग एक चित्रं दाखवल्याने आपल्याला वाटतं की हा संभोग सलग होतोय. त्यामुळे पुरुषांनी आपल्या संभोगाचा कालावधी या चित्रपटांवर मोजू नये. सरासरी संभोगाचा कालावधी किती असतो? याबाबत लैंगिक अनुभव या सत्रात माहिती दिली आहे. सुरक्षित संभोग अनेक ब्ल्यू फिल्म्समध्ये (विशेषतः भारतात बनलेल्या) कंडोमचा वापर झालेला दिसत नाही (अमेरिकेतल्या ब्ल्यू फिल्म्समध्ये कंडोमचा वापर झालेला दिसतो.). जर ब्ल्यू फिल्म्स्मध्ये कंडोमचा वापर दिसला नाही तर कंडोम वापरायची आवश्यकता नाही असा चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो. जनावरांबरोबर संभोग काही वेळा ब्ल्यू फिल्म्समध्ये माणूस व जनावर यांच्यामधील संभोग दाखवला जातो. अशा कृती बघून काहीजणं आपल्या जोडीदाराने एखादया जनावराबरोबर ९० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख