पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लैंगिक सुखाची साधनं कृत्रिम लिंग कृत्रिम लिंग हे लाकूड/रबर/प्लॅस्टिकचं बनवलेलं असते. ते योनीत किंवा गुदात घालून लैंगिक सुख मिळवता येतं. व्हायब्रेटर हे उपकरण कृत्रिम लिंगासारखंच असतं पण त्याच्या आत एक मोटर व बॅटरी असते. मोटर सुरू झाली व्हायब्रेटरला कंपनं येतात. हा व्हायब्रेटर शिस्निकेला, वृषणांना, लिंगाला लावून, योनीत किंवा गुदात घालून लैंगिक सुख मिळतं. रबराची बाहुली जशी हवेची उशी असते तशी स्त्रीच्या आकाराची हवेनं फुगवता येणारी रबराची बाहुली असते. ती बाहुली हवेने फुगवून तिच्या योनीत लिंग घालून संभोग करता येतो. एनल बीड्स ही प्लॅस्टिक किंवा रबर किंवा स्टीलची, तीन ते आठ मण्यांची माळ असते जी योनीत किंवा गुदात घालून विविध वेगानं बाहेर ओढायची असते. त्या मण्यांच्या घर्षणातून स्त्रीला/पुरुषाला लैंगिक सुख मिळतं. पेनिस स्लीव्ह हे नळीसारखं उपकरण असतं ज्याच्यावर मणी बसवलेले असतात. हे उपकरण लिंगावर चढवलं जातं. या मण्यांमुळे योनीमैथुनात स्वीकृत जोडीदाराला जास्त घर्षण जाणवतं. निप्पल क्लप स्तनांची बोंड उत्तेजित करण्यास हे 'चिमटे' स्तनांच्या बोंडांवर बसवले जातात. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख ८७ j