पान:माधवनिधन.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवंबर १८९९] माधवनिधन. ८७ माधव-[ उघड ] हो. [ आपल्याशी ] न बसून चालते कुठे ? [ जेवायला बसतो, पण अन्न चिवडतो.] । नाना-[ हलकेच ] श्रीमंतांना काय पाहिजे ? माधव-कोणाला मला ! मला काहीएक नको. [आपल्याशी ] मला जे पाहिजे ते कुठे मला मिळत आहे. नाना-आतांशा श्रीमंतांनी अशी वृत्ती कां धरली? श्रीमंतांस काय होत : आहे, ते कळलं ह्मणजे त्याला लवकर उपाय करता येईल. सांगितल्याशिवाय या श्रीमंताच्या चाकराला कळगार कसे ? श्रीमंतांच्या घरी काही कमी आहे की काय ? श्रीमंतांनी पूर्वीप्रमाणे बोलले पाहिजे, चाललं पाहिजे, सर्व मन मोकळे करून सांगितलं पाहिजे. माधव-[ आपल्याशी खेदानें ] हंः ! [ चमत्कारिक हांसून ] बोलक्या चालक्या बाहुल्याला ही कळसूत्री बाहुल्याप्रमाणे जसा सूत्रधार बोलवील, चालवील, हात वारे करायला लावील; जे जे काही करायला लावील तें तें केलंच पाहिजे. त्याच्या मनांत जरी नसलं तरी त्याला स्वतांच्या इच्छेप्रमाणे थोडेच करतां येतं! नाना - मोरोपंत, श्रीमंतास श्रीखंड आणि घीवर आणून वाढवा ? मोरोपंत- [ वाढप्यास ] अरे आण लवकर ! [ वाढपी श्रीखंड आणि घीवर आणून वाढू लागतो. ]. माधम-[ हाताने ] नको, नको ! नाना-थोडं, थोडं, घ्यावं ! थोडं घेतलं पाहिजे. वाढरे ! माधव-[अन्न चिवडून त्याच्याकडे पहात रहातो ] [ आपल्याशी । जठराग्नि चांगला प्रदीप्त झाला ह्मणने मोठे लोक या सुग्रास पक्वानांनी त्याची शांति करतात. रानावनांत हिंडणारे आणि दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत काबाडकष्ट करणारे लोक जाड्याभरड्या भाकरीने, अथवा दुसऱ्या कशानेही त्याची शांती करतात; त्याचप्रमाणे पशुपक्षी वगेरे जीवजंतही आ. पापलें भक्ष्य मिळवून आपल्या जठराग्निची शांती करतात, पण त्याची सर्वीनी आपापल्या प्रकारांनी शांती केल्यावर सर्वांना होणारा आनंद मात्र पर