पान:माधवनिधन.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. वर्ष ७ खा, त्यांत मात्र कांहीं निराळा प्रकार नाही. जठराग्नि प्रदीप्त नसला ह्मणजे मग तें सुग्रास अन्न असलं तरी त्याचा काहीएक उपयोग नाही. ते निव्वळ वीष होय ! तें वीष, तें निरुपयोगी अन्न पशु देखील मग खात नाहीत. त्यांच्यापुढे ते आलं तर ते तोंड मुरकतात; पण मी मनुष्य असून असलें अन्न रोज पशूप्रमाणे भराभर खाऊन चांगला पोळासारखा पोसलों आहे. माझे आप्त, मित्र कोणत्या संकटांत असतील, बाबासाहेब, आप्पासाहेब, त्यांचं कुटंब, बलवंतराव नागनाथ वगैरे मंडळीला आठ प्रहरांतून एकदा तरी जठरानिची शांती करण्याकरितां जाडे, भरडे, ओलं वाळलं, कसं तरी अन्न मिळालं आहे की नाही, याची मी कधी तरी चौकशी केली काय ? कधी कधी नाहीं ! रोज आपल्या उदराची मात्र भरती करीत आहे. पशु, पक्षी देखील आपल्या स्वजातीयांची कधी कधी काळजी करतात, पण मला मनुष्यरूपी पशला आपल्या स्वकीयासंबंधाची कधी सुद्धा काळजी वाटत नाही. ( स्वस्थ वर पहात बसतात.) नाना-श्रीमंत असे काय करतात ? त्यापैकी थोडंसं खाल्लं पाहिजे. त्याशिवाय प्रकृतीला आराम कसा वाटेल. माधव- ( आपल्याशी ) हे माधवा, बैला, अप्पलपोट्या पशो, तूं त्या अज्ञान पशूपेक्षाही पशू आहेस; दुसऱ्याचं दुःख सुख कांही एक मनांत न आणता, निष्काळजीपणानं तूं आपलं मात्र शरीर पोळासारखं पुष्ट दिवसेंदिवस बनवीत आहेस ! आणि हे सर्वजण तुला चांगलं खाऊ पिऊ घालून, तं चांगला धष्ट पुष्ट आणि माजलेला पोळ व्हावंस, व जगापुढे तुझं चांगलं प्रदशन करावं आणि आपल्या देखरेखीखाली हा बैलोबा चांगला माजला, एव. ट्याबद्दल आनंद मानावा ह्मणून आग्रह कर करून व तुला चांगलं चांगलं खायला घालून माजवीत आहेत; हे शंखशिरोमणे तुला कसे कळत नाही ? अरे ठकानों तमचे सर्व कारस्थान माझ्या पूर्णपणे ध्यानात आले आहे ! पाहूं बरं तमी मला कसे माजविता तें ! या बाबतीत मी तुमचे कधी चालू देणार नाहीं ! एवढे करणे माझ्या स्वाधीन आहे. असे केलें ह्मणजे मग तुह्मी काय कराल ? बैला, माधवा, उठ, पळ विचार काय करतोस ! पळाला ना.