पान:माधवनिधन.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

A कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ नाहींसें केलं पाहिजे होतं. पण मतिमंदा माधवा, तूं यापैकी एक, एक तरी गोष्ट करायची होतीस? पेशव्यांच्या कुलांत जन्मून, त्यांतील पराक्रमी पुरुषाचं नांव वेऊन त्यांच्या नांवाची मात्र तूं थट्टा केलीस ? स्वार्थ नाही, परमार्थ नाहीं आणि पुरुषार्थही नाही, यापैकी एकही न साधणारा मनुष्य जन्मन व्यर्थ, व्यर्थ ! देवा-( हात जोडतो.) पूजारी–हें तीर्थ आहे ! ( देवाचें तीर्थ त्याच्या हातावर चालतो.) ( इतक्यांत दाजीवा येतात.) दाजीवा-सर्व तयारी होऊन, नाना पाटावर येऊन बसले आहेत, तेव्हां श्रीमंतांनी भोजनास चलावे. माधव- (तीर्थ हातात घेऊन ) हा असा निरुपयोगी प्राणी जन्मास तरी कशाला घातलास ? ज्याच्या हातून काही तरी पुरुषार्थ होतो, ज्याचा काही तरी उपयोग आहे, तोच खरोखर धन्य ! तोच खरोखर पुण्यवान ! तोच खरोखर श्रीमंत, आणि त्याचाच प्रताप. खरोखर सर्व माझे वाडवडील तसे होते, पण मी तसा नाही. मी महापातकी आहे; तेव्हां असा पातकी आपले दर्शन घेण्यास सुद्धां योग्य नाही. माझ्या दर्शनाने, माझ्या सहवासाने आणि म्पशाने चांगल्या वस्तु असतील त्या वाईट होतील; उपयोगी त्या निरूपयोगी ठरतील; पुण्यकारक त्या पापी होतील; याकरितां या आपल्या पुण्यकारक चरणतीर्थाला माझा पातक्याचा स्पर्श नको; पुण्यकारक सर्व वस्तूंना माझा हा असा लांबूनच नमस्कार पुरे आहे ! ( तीर्थ टाकून देऊन निघून जातो. ) प्रवेश सातवा. स्थळ- शनवारच्या वाड्यांतील श्रीमंतांची भोजनाची जागा. पात्रं-श्रीमंत माधवराव पेशवे, नाना फडणवीस, मोरोपंत भाने, दाजीवा आपटे, अवांतर मंडळी पानावर बसली आहे. माधव म राव सचिंत आहेत. नाना--( ओळंबून ) श्रीमंतांनी बसावें.