पान:माधवनिधन.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवंबर १८९९] माधवनिधन. वारीवर तरवारी एकसारख्या खणखण आपटत आहेत, तरवारीच्या झटक्याबरोबर हजारों मराठे, ब्राह्मण व मुसलमान वीरांची शिरें सपासप उडत आहेत, भाले, बरच्या, यांनी झालेल्या जखमांतून सर्वांच्या अंगांतून रक्ताचे प्रवाह वाहत आहेत, एकमेकांच्या नरडीचा घोट केव्हां घेऊ, असें ह्मणत, विजयश्रीचे दोघा वीरांनी दोन हात धरून जो तो तिला आपल्याकडे ओढीत असतां, रणावेश चढल्यामुळे ज्यांना आपल्या देहाचे व प्राणाचे भान राहिले नाही, आणि ज्यांनी तिला संतुष्ट करण्याकरिता आपले देह खरोखर अर्पण केले; त्याच माझ्या शूर व बहाद्दर, ब्राह्मण आणि मराठे वीरांनी मोंगलांची खोड मोडली. मी मुळीच मोडली नाही. कारण मी तर त्या वेळेला लढाईच्या जागेपासून सुमारे दोन तीन कोस मागे अमून, एखाद्या पडद्यांतल्या बायकोप्रमाणे किनखाफी तंबूत उंच आणि मऊ गादीवर लोळत पडलो होतो; आणि माझी ही तरवार माइयाप्रमाणेच खुशाल म्यानांत झोप घेत पडली होती. असे असून हे सर्वजण माझा चरणप्रताप आणि श्रीमंतांची पुण्याई ह्मणतात. हेच आश्चर्य आहे! केवढा यांचा हा मूर्खपणा ! हे असें ज्या अर्थी नेहमी ह्मणतात, त्याअर्थी ते माझी थट्टाच करतात ! हो थट्टाच नाहीतर काय? माझ्या अंगी जर खरोखर तसं शौर्य आणि पराक्रम असतां, तर माझा स्नेही बाबराव फडके कच खाऊन मागें आला असतांना त्याच्या मदतीला मी तावडतोब गेलो नसतों काय ? माझा शूरमणी गोपाळराव पटवर्धन मृत्यूमुखी प. डला असता, त्याच्याकरितां मी धांवत जाऊन त्याला मृत्यूच्या जबड्यांतून ओढून काढला नसतां काय ? माझे शूर योद्धे माझ्याकरितां आणि माझ्या नांवाकरितां शत्रुवर चढाई करून गेले असतां, मी त्यांच्या आघाडीवर प्रथम भरधांव घोडा टाकीत गेलो नसतो काय ? असा बायकासारखा तंबूत लपून माशा मारीत बसलो असतों! कधी, कधी, स्वस्थ बसलो नसतो. मी जर माइया लोकांचा मालक, माझ्या मित्रांचा. मित्र, आणि माझ्या आप्तांचा आत आहे, तर माझ्या लोकांकरितां मला त्यांच्यापुढे व्हावयाला पाहिजे होतं. म झ्या मित्रांना पाठीशी घालायला पाहिजे होतं, आमचे आप्त, बाबासाहेब आप्पासाहेब, व मित्र नागनाथ यांचा प्रतिबंध, त्रास आणि द:ख तात्काल २२