पान:माधवनिधन.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ मनापासून कधी भजन केले आहे ? कधीं नाही. अहाहा, ज्यांनी हा आजचा पूजेचा थाट केला, व जे त्याचे गुणानुवाद गात आहेत, ते खरोखर धन्य आहेत ! कोणीरे हा पूजेचा थाट केला ? मोरोपंत-( पुढे होऊन ) श्रीमंतांना गणपतीच्या उत्सवांत अशा देवाच्या पूजा बांधलेल्या आवडतात, ह्मणून उत्सवास सुरुवात झाल्यापासून रोन निरनिराळ्या प्रकारची पूजा बांधावी ह्मणून नानांची आज्ञा झाल्यावरून ही आज केवड्याची पूजा त्यांच्या आज्ञेनं बांधली आहे. माधव-( कपाळाला आढ्या घालून ) हंः असे काय ? ही देवापुढे काढलेली सांजी कोणी काढिली ? काम फारच सुबक केलं आहे ! यांत काढणाराची चतुराई दिसते. मोरोपंत-लांब, लांबचे सांजी, रांगोळ्या व चित्रे काढणारे लोक यांची इच्छा आपलं कसब येथे दाखवावं, व ते पाहून श्रीमंतांनी त्यांच्या कसबाची चीज करावी, ह्मणून नानांच्या हुकूमानं त्यापैकी रोज एक नामांकित कारागिर आपलं कसब दाखवीत असतो. __ माधव-( आपल्याशी ) त्यांच्या कारागिरीचं चीज करण्याचं माझ्या अंगी सामर्थ्य कुठं आहे ! ( उघड ) ही भिंतीवरची चित्रे, ही आरास वगैरे कोणी केली ! . मोरोपंत-श्रीविघ्नांतक गणपती, श्रीमंतांचं आराध्य दैवत, त्याच्या कृपे मुळे, आणि श्रीमंतांच्या चरण प्रतापामुळे महाराष्ट्रराज्यावर आलेले मोठे वि.. टळले, निजामाची चांगली खोड मोडली, आणि पूर्वीप्रमाणे सर्व यथास्थित झालं, ह्मणून सर्व उत्सव मोठ्या थाटाने करावे, अशी नानांची एकसाहा आज्ञा झाल्यावरून हे त्यांच्या आज्ञेप्रमाणे केले आहे. श्रीमंतांची आज्ञा कोण मोडील? माधव-(संतापून आपल्याशी ) आग लागो त्या श्रीमंतांच्या चरणाला आणि त्यांच्या प्रतापाला ! निजामाची खोड कोणी मी-मी-श्रीमंत माध वराव पेशव्याने आणि माझ्या चरण. प्रतापाने मोडली ! बंदुकीच्या व तोफेच्या गोळ्याची पाऊसाच्या धारेसारखी वृष्टी होत आहे, ढालीवर ढाली, तर