पान:माधवनिधन.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवंबर १८९९] माधवनिधन. ८३ तुझ्या कपाळी अखेर दुःखच आहे. देवीनो, जिने तुमची एवढी मनोभावानं पूजा केली, तिचं तुह्मी तरी कल्याण करा ! छे, तुह्मी मातीच्या देवी ! तुमच्यांत देवपण कुठे आहे ? तुह्मी करतां कपाळ आपलें ! देवांत देवपण नाही, मनुष्यांत मनुष्यपण नाहीं, सर्वत्र महा—(देवी उचलून टाकून निघून जातो) प्रवेश६ वा. स्थळ-गणपतीमहाल. पात्रे-गणपती बसवून, हांड्या, झुंबरे लावून मोठा थाट केला आहे, पुजारी पूजा करीत आहेत; दोन्ही बाजूनी मंडळी उभी राहून मोठ्याने गणपतीचा स्तव करीत आहेत, असा पडदा उघडतो. सर्व मंडळी-( सुस्वर गळ्यावर मंडळी पदें ह्मणतात, इतक्यांत श्रीमंत सवाई माधवराव पेशवे जरीकांठी पितांबर नेसून, अंगावर जरीकांठी शालजोडी घेऊन, हातांत चांदीचा पेला, पळी घेऊन येतात आणि गणपतीसमोर त्याच्याकडे पहात राहतात; मंडळी ते आले असें पाहून स्तब्ध होतात.) माधव-( सचिंत मुद्रेनें ) पेशव्यांच्या कुलांत ज्या पुरुषांनी जन्म घेतला, त्यांनी या त्यांच्या उपास्य देवतेचं निरंतर भजन, पूजन व अर्चन करणं आणि आपल्या प्रजेचं यथान्याय प्रतिपालन करणं, हेच त्याचं मुख्य कर्तव्यकर्म आहे. माझ्या वडिलांनी, माझ्या चुलत्यांनी, माझ्या आजा, पणजांनी हे आपलं कर्तव्यकर्म पूर्णपणे लक्षांत वागविलं, आणि त्याप्रमाणे त्यांनी आपलं वर्तन सदोदित ठेवलं; ह्मणूनच त्यांना त्यांच्या शत्रूना पादाक्रांत करून, आपला आणि मराठीराज्याचा प्रभाव सर्व जगाला दाखविता आला; आणि मगनच सर्व जग त्यांचे गुणानुवाद अद्याप गात आहे. पण मी माधवानं त्यांच्या उत्तम कुलांत जन्मून या गोष्टीपैकी कोणच्या गोष्टी केल्या ? कधी मी स्वस्थ अंतःकरणानं या माझ्या उपास्य देवतेची या हातानं पूजा केली आहे, की एकाग्र चित्तानं या सुंदर मूर्तीचे ध्यान. करून ती माझ्या हृदयांत सांठवन ठेवून, तो ब्रह्मानंद कधीं अनुभवला आहे ? किंवा या भक्तवत्सल, विघ्नेशाचं