पान:माधवनिधन.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. वर्ष ७ कैदेत राहावे लागेल, कोणाला किल्ल्याच्या अंधारकोठडीत आपला सारा जन्म घालवावा लागेल, कोणाच्या हातापायांत मोठमोठ्या वजनदार विज्या पडतील, कोणाच्या पाठीवर कोरडे ओढले जातील, असं कोणाला काहींना काही तरी दुःख भोगलंच पाहिजे. त्यांना दुःखमुक्त करण्याचे माझ्या अंगी यत्किचित् सुद्धा सामर्थ्य नाही. जितके मरतील तितके मात्र दुःखापासून मुक्त ! बाकीच्यांनी दुःखांत राहून सडून सडून मेलंच पाहिजे. माझी आई लहानपणी वारली ह्मणून फार चांगलं झालं, नाहीतर तिच्या प्रेमळ अंतःकरणावर तिच्या पुत्राची तिला खरी स्थिती कळल्यावर, दुःखाचे घाव इतके पडले असते की, त्यामुळे त्या अंतःकरणाचे तिळा तिळा एवढे तुकडे झाले असते. माझी रमा लवकरच यमसदनी गेली, हे किती चांगलं झालं, नाही तर तिचं हृदय तिच्या पतीची स्थिती पाहून शतशः विदीर्ण झालं असतं. आई, बाबा, आजोबा, रमे, तुझी सर्वजण खरोखर भाग्यवान ! मी आणि माझे आप्स, मित्र, जे मागे राहिले आहेत ते मात्र खरे खरे अभागी आहेत. मला आई नाही, बाप नाही, आप्त, मित्र, वगैरे मला काही एक गणगोत नाही; तेव्हां माझ्या सारखा पोरका आणि अभागी पती तूं पुढील जन्मी तरी मागू नकोस ? एका जन्मांतच तुला जे माझ्यामुळे दुःख भोगावं लागेल तितकं बरस आहे. यशोदे, मी मात्र रमेसारखी आणि तुझ्यासारखी मैत्रिण मला जन्मोजन्म मिळावी ह्मणून देवाची रात्रंदिवस प्रार्थना करीन. कारण मला स्वतांला सुख पाहिजे; मी मात्र सर्वांना दुःख देणार. असा हा माझा आपस्वार्थीपणा आहे. जगांत असाच चहूंकडे आपस्वार्थीपणा माजला आहे. आपलं झालं ह्मणजे झालं ! दुसऱ्याच्या मुखदुःखाची कोण पर्वा करतो. यशोदे, माझा मतलब मी पाहिला, तुझा तूं पहा. पण हा मतलबीपणा तुला कळला नाहानाः तूं यापैकी काही ऐकलं नाहींसना ? ऐकलं असशील तर सर्व विसरून जा. अथवा तूं एकदम बहिरी, आंधळी, आणि मुकी अशी हो. ह्मणने तुला तुझ्या पतीची स्थिती ऐकतां येणार नाही, पहाता येणार नाही, आणि तिच्या बद्दल होत असलेलं दुःख तुला लोकापाशी सांगतांही पण येणार नाही. याशिवाय तुझं दुःख कमी करून घेण्याला तुला दुसरा उपाय नाही! नाहीतर