पान:माधवनिधन.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवंबर १८९९) माधवनिधन. करीत बसली आहेस, त्याचप्रमाणे मलाही माझ्या पतीच्या चरणाची सेवा अखंड मिळू दे आणि मला हे चरण जन्मोजन्मी मिळू दे. ( फुलं वाहते व नमस्कार करते, इतक्यांत माधवराव पेशवे धोतराचे सोगे सुटले आहेत, अंगावरचा शेला मागें लोळत आहे, असा एकदम येऊन उभा राहतो.) शागिर्द-भटनी, उठा, बाईसाहेब एकीकडे व्हा, ती पहा सरकार स्वारी इकडेच येत आहे. ही पहा आलीच. यशोदा-खरेच ! पण हे असे काय तें. ( सर्वजण निघून जातात.) . माधव-( हरतालकेकडे पाहून आपल्याशी ) हे काय हे ! ( देवीवरची फलें एका बाजूला करून ) ही हरतालका आहे ! जी आतां पूजा करीत होती, जिने बहुमोल वस्त्राभरणे धारण केली होती, जी आतां विजेप्रमाणे चमकत निवून गेली ती कोण ? ती माझी यशोदा, कां ही हरतालका देवी तिच्या रूपाने मूर्तिमंत होऊन गेली ? नाहीं, ती यशोदाच ! पण ती येथे काय करीत होती? डोळे मिटून हात जोडून हिच्यापाशी काय मागत होती? सर्व स्त्रिया हरतालका देवीची पूजा करून आपल्या पतीचे अभिष्ट चिंतन करतात, आणि या जन्मी जसे मला शंकरासारखे पती मिळाले आहेत, तसे पती जन्मोजन्म मिळावे ह्मणून लिच्याजवळ आणि शंकराजवळ वर मागतात, तसेच माझी यशोदा करीत असली पाहिजे. पण यशोदे, तूं एका गोष्टीत अगदी चुकत आहेस ! वर मागण्यांत तूं निव्वळ वेडेपणा करीत आहेस. देवापाशी वर मागतांना नीट विचार करावा, नाहीतर भलतेच होते. माझ्यासारखा अभागी पती जन्मोजन्म मागण्यांत तूं आपल्या हातानं आपल्यावर दुःखाचे डोंगर कोसळून घेत आहेस. त्याच्याखाली तूं दडपून जाशील. तुला सुखाचा वारा एक क्षणभर देखील लागणार नाही. जर कांहीं तुला सुख लागलं तर ते मग मृत्यूच्याच घरी! या जन्मांत आणि या जगांत जोपर्यंत तं माधवराव पेशव्याची स्त्री आहेस, तोपर्यंत त्याची तुला आशा नको. तलाच काय पण माधवराव पेशव्याचे जितके ह्मणून आप्त, इष्ट, मित्र सध्यां जिवंत आहेत, तितके सर्व दुःखाच्या तापानं होरपळनच निघणार ! कोणाला नजर