पान:माधवनिधन.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ मोरो-फितुरी मनुष्याबद्दल शिफारस करणेच मुळी बरोबर नाही. ___ दाजीवा-आतां बलवंतरावाला जन्मभर कैदच ह्मणायची ! त्यांतून मुटण्याची कांहीं आतां आशा नाही. - मोरो०-छे, सुटण्याचे नांव काढू नका ! आपल्या कारस्थानाचा काय परिणाम झाला, हे बाजीरावाच्या नेहमी डोळ्यासमोर असावे, आणि त्याने पुन्हां असल्या भानगडीत पडूं नये, ह्मणून नानांनी बलवंतरावाच्या हातापायांत मोठ्या वजनदार बिड्या ठोकून, त्याला पिंजऱ्यांत घालून शिवनेरी किट्यावर ठेवले आहे, त्याची स्थिती पाहून आपणाला आपल्या कामगिरीबदल सावध राहिले पाहिजे. श्रीमंतांची पाठ मुळी सोडता कामा नये. त्यांची अनिष्ट स्थिती झाली आहे, तेव्हां त्यांच्यावर सक्त देखरेख रात्रंदिवस ठेवली पाहिजे. ते, ते, पहा श्रीमंत, अगदी लगबगीने तिकडे जात आहेत. तेव्हां चला, आपणालाही त्यांच्या आसपास असले पाहिजे. दाजीवा-हो, हो, खरेंच चला. ( दोघे जातात.) जाते प्रवेश ५ वा. स्थळ - शनवारच्या वाड्यांतील मधला दिवाणखाना. पात्रं-हरतालकेच्या पुजेचा थाट केला आहे. श्रीमंत सौभाग्यवती यशोदाबाईसाहेब हातात फुले घेऊन डोळे मिटून हरतालकेची स्तुती करीत उभ्या आहेत, जवळ शागीर्द उभा । स आहे, आणि भटजी पूजा सांगत आहे. यशोदा-( आपल्याशी ) हे माते हरतालके, तूं जशी आपल्या पतास शंकराच्या वरप्रदानाने प्रिय झालीस, आणि अखंड सौभाग्यसुख भोगलस, त्याचप्रमाणे मलाही आपल्या पतीस प्रिय होऊ दे. हे देवी भवानी माते, तू जशी शिवाची पूजा करून त्यांना प्रिय होऊन त्यांची अधांगी हाऊन बस लीस, त्याचप्रमाणे मलाही आपल्या पतीची अर्धांगी होऊ दे. हे महालक्ष्मी, आई जगदंबे, तूं जशी आपल्या पतीला प्रिय होऊन, त्यांची चरणसेवा सतत .