पान:माधवनिधन.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माधवनिधन. प्रवेश चवथा. स्थळ-शनवारवाड्यांतील कचेरी. पात्र—मोरोपंत भावे आणि दाजीबा आपटे येतात. मोरोपंत-दाजीबा, पाहिलेतना बलवंतरावाचे कारस्थान, आणि त्याचा परिणाम ? . दाजीबा-हो पाहिला! तो असें करील असे मला मुळीच वाटले नव्हते! मोरोपंत- दाजीबा, खर विचाराल तर मला त्याचा पूर्वीच थोडासा संशय आला होता. अहो, तो जेव्हा जेव्हां येथे येई, तेव्हां तेव्हां श्रीमंताशी त्याच्या आपल्या चार चार घटका गोष्टी व्हावयाच्या! तेव्हां झटलं की हे आहे काय ? तेव्हां हे असं होतें बरें! आपला स्नेही होता, श्रीमंतांपाशी त्याची पूर्वीपासून जाण्यायेण्याची वग होती, ह्मणून आपण त्याची फारशी चौकशी केली नाही. बाजीरावाने मध्यस्थी करण्याला मनुष्य फार उत्तम शोधून काढला. नाना देखील त्याचे कारस्थान पाहून अगदी थक्क होऊन गेले. । दाजीबा-श्रीमंताना बाजीरावाकडून आलेली सर्व पत्रं नानांच्या हाती लागलींना ? मोरोपंत-सगळी काही लागली नाहीत, पण काही लागली ! दाजीबा-ज्या दिवशी ती पत्रे नानांच्या हाती लागली, त्या दिवशी नाना श्रीमंतांना बरेंच रागें भरले, आणि त्यामुळे श्रीमंतांच्या वृत्तींत त्या दिवसापासून फरक झाला, असें नाहीं कां तुमाला वाटत ? मोरोपंत-नुसत्या रागें भरण्याने असे मुळीच होणार नाही. बरे नाना रागें भरले ह्मणून काय झाले. श्रीमंतांना त्यांनी लहानपणापासून पोटच्या पुत्रापेक्षा आणि आपल्या प्राणापेक्षाही जास्त काळजीने वाढविले आहे. तेव्हां त्यांना रागें भरण्याचा नानांना वयपरत्वे हक्कही आहे. हा सर्व बाजीरावाच्या जादूच्या ताईताचा परिणाम आहे. हे तुह्मी पकें लक्षात ठेवा. दाजीबा-श्रीमंतांनी बलवंतरावाबद्दलही नानांना शिफारस केली होती, पण तीही त्यांनी ऐकिली नाही, त्यामुळे श्रीमंतांना बराच राग आला, आणि ते नानाशी अथवा दुसऱ्या कोणाशीही त्या दिवसापासन बोलेनासे झाले.