पान:माधवनिधन.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. वर्ष ७ कार, धिःकार असो तुला ! हे सर्व कशाकरितां, तर स्वतांच्या स्वार्थाकरितां अः ! अरेरे कोण हा नीच स्वार्थीपणा ! या स्वार्थानेच तर चहूंकडे अनर्थ आणि प्रळय करून दिला आहे. हा नीच स्वार्थीपणा मनुष्यमात्रांना अधोगतीला आणि नीचपणाला नेऊन पोहचवितो, जगांत वर तोंड सुद्धा कोणाला कार्दू देत नाहीं; असें पदोपदी अनुभवास येत असूनही मनुष्य तो कुठे सोडतो आहे ? दिवसेंदिवस मनुष्य त्याचीच कांस बळकट धरीत आहे. तो सोडल्याशिवाय मनुष्य मैत्रीला, विश्वासाला, कोणत्याही चांगल्या कामाला उपयोगी नाही. हे जग अशा मजसारख्याच स्वार्थी मनुप्यांनी भरले आहे काय ? ( बाबूरावाकडे पाहून ) नाही, नाही आपल्या जिवलग स्नेहाकरिता वाटेल ते करायला तयार असणारे असे काही पुण्यात्मेही आहेत, पण यांना मी माझं जिवलग स्नेही ह्मणून ठकविलें ! आतां यांना मी आपले हे तोंड कसे दाखवू ? निर्लज्जा, ठका, तुला त्यांना तोंड दाखविण्याला अद्याप शरम कशी वाटत नाही ! बरोबर आहे, कोणतेही नीच कृत्य करून, पुन्हां राजरोसपणे मान वर करून मिरवायला बेशरम मनुष्याला कधीच शरम वाटत नाही. धिःकार, धिःकार असो त्या स्वार्थीपणाला, त्या स्वार्थ्याला, आणि माझ्या ठकविधेला. अधमा, बेशरमा, माधवा, निव, निव, येथून, आपले काळे कर. ( रागाने निघून जातो.) बाबूराव – ( आपल्याशी ) असेंच आतांशा चालले आहे. काही तरी करतात, काही तरी बोलतात, मध्येच रागावतात. अशी ही श्रीमंतांची भ्रमिष्ट स्थिती झाली आहे. ती इतकी थोडक्या दिवसांत झाली, त्यावरून बाजीरावांकडून आलेल्या ताईतासंबंधाने नानासाहेबांचे ह्मणणे अगदी खर वाटू लागते. त्याशिवाय अशी स्थिती इतक्या लवकर होण्याचे संभवत नाही. परमेश्वरा आमच्या श्रीमंतांची प्रकृती लवकर ताळ्यावर आण ? जसजशी श्रीमंतांची प्रकृती बिघडत चालली, तसतशी नानांचीही प्रकृती काळजीन शुष्क होत चालली आहे. त्यांना आतां श्रीमंतांच्या प्रकृतीशिवाय दुसरे काहीएक काम सूचत नाही. अशी जरी स्थिती आहे तरी झालेली हकीकत नानांच्या कानावर घातली पाहिजे, त्याशिवाय याला काहीएक तोड निघणार नाही. ( जातो.)