पान:माधवनिधन.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७७ अक्टोबर १८९९] माधवनिधन. हाटलों तर मी तात्यासाहेबांच्या पोटी आलोच नाही. पण सरकारच्या जागेवर बसण्याचे दुष्ट कृत्य मात्र मी कधी करणार नाही. ज्याचें में स्थान तेच त्याला योग्य ! त्याने दुसऱ्याच्या स्थानाची कधी इच्छा धरूं नये. सरकारचे स्थान सरकारासच योग्य आहे. शिवाय ते ईश्वरदत्त असल्यामुळे त्याची अदलाबदल करण्यास मनुष्य असमर्थ आहे. माधव-कायहो, तुह्मी माझे जिवलग स्नेही ह्मणून ह्मणतां, आणि तुमच्याने मी ही एवढीशी गोष्ट सांगितलेली करवत नाही. मग तुझी माझें स्नेही कसले ? ( विचार केल्यासारखे करून ) बरोबर आहे, तुह्मी में ह्मणतां ते अगदी खरे आहे ? कारण तुमाला मी अदलाबदल करायला जी सांगितली, तीत मी तुमचे कोणचं हित पाहिले. एक दुसऱ्याचा जिवलग स्नेही झाला ह्राणजे दोघेही परस्पर जिवलग स्नेही झाले. मग उभयतांनीही एकमेकांचे हित अनहित पाहिले पाहिजे. तसें जर दोघांपैकी एकाने केले नाही, तर तो दुसयाचा जिवलग स्नेही ह्मणवून घेण्याला योग्य नाही. तो स्वार्थी, मतलबी, आणि अप्पलपोट्या होय ! तशी गोष्ट माझ्या हातून मुळीच झाली नाही. मी त्या गोष्टीत आपला स्वार्थ पाहिला. तुमाला माझी स्थिती दिल्याने, तुमाला जर मुळी दुःख नसेल तर ते दुःखरूपी वीष मी, मी, तुमच्या जिवलग स्नेहाने तुमच्या शरिरांत घातले. जर तुमाला दुःख थोडे असेल, तर तो दुःखरूपी विषाचा तुमचा बडा, मी आपले दुःख त्यांत घालून तो अगदी कांठोकांठ भरून टाकला. मनाच्या असह्य तापाने मी तुमच्या शरीराची अगदी आग, आग, भडका करून दिली; तुझी स्वतंत्र असून तुह्माला बंदिवान केलें, जितके ह्मणून चांगले आणि आनंददायक तुमच्या जवळ होते, तितकं सर्व तुमचं मी आपल्या स्वार्थीकरितां हिरावून घेऊन, तितकेंच वाईट आणि दुःखदायक असे माझे सर्वस्व तुमाला दिले ! ही सर्व ठकबाजी मी, मीच तुमच्या जिवलग मित्राने प्रथम तुमच्याशी केली. त्याबद्दल मला क्षमा करा ! (रागाने दांत ओंठ खाऊन) अरे अवमा, ठका, माधवा, तुझ्या जिवलग स्नेहाशी, तुझं अन्य आपस्वार्थीपणाचे वर्तन ! तूं स्वतां, त्या सर्वांहून पूज्य अशा मित्रस्थानाची व त्या आनंददायक मैत्रीची अशी थट्टा आणि अशी वंचना करतोस ? धिः