पान:माधवनिधन.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५) आपल्या पतीने माधवरावाच्या संमतीने बाजीरावाची पत्रे व जिन्नस एकमेकांकडे पोहचविली, यांत मोठेसें कांहीं केलें नसून त्याला जन्मभर कैद भोगण्याची शिक्षा नानांनी दिली असतां, सत्यभामेसारख्या दृढनिश्चयी बायकोनें आपल्या पतीच्या सुटकेकरितां थेट मालकापर्यंत दाद मागू नये ! ज्या माधवराव पेशव्याच्या कामाकरितां आपला पती बंदीवासांत पडला त्याची हरत-हेनें भेट घेऊन, त्याला तिने सर्व गोष्टी समजून सांगितल्या आणि त्याच्या हा. लन जेव्हां कांही उपयोग होत नाही असे तिने पाहिले, तेव्हां नाना खरे मालक, किंवा तुह्मी खरे मालक असें माधवरावाला स्पष्ट विचारून लानविलें; त्याचंही जेव्हां उत्तर मिळेना, तेव्हां शेवटी निराश होऊन आपला प्राणही देण्यास तिने तयार होऊ नये तर काय करावे ? - । माधवरावाने सकाळी वैद्य हात पाहून गेल्यानंतर तीन चार घटका दिव. सास माडीवरून उडी टाकिली असें बखरीत लिहिले आहे. वैतागलेल्या मनप्याला आपल्या जिवाचा जरी कंटाळा आला असला, त्याला आपण प्राण द्यावा असे जरी पूर्वी दोन चार वेळ वाटले असले, तरी उद्यां तीन घटका दिवसास आपणाला उडी टाकावयाची आहे असे तो मुळीच ठरवून ठेवीत नाही. मनुष्य स्वस्थ बसलेला असून काहीएक कारण नसतां, उठून तरवार अथवा पिस्तुल मारून घेईल, अथवा उडी टाकील असें क्वचित होते. मनुप्याच्या मनोवृत्ती जागृत होऊन प्रबल झाल्या ह्मणजे, त्या त्वेषांतच अशी आत्महत्येसारखी गोष्ट घडून जाते. एरवी असे होणे जरा दुरापस्तच. मनाची आधीपासून तशीच प्रवृत्ती व्हावी लागते ही मुख्य गोष्ट. पुढचे कृत्य हो. ण्याला दुसरे कारण हे निव्वळ निमित्य होय. तोफ डागून, कानावर दारूठेविल्यानंतर मग रंजूकाचा जसा उपयोग होतो, त्याचप्रमाणे ही गोष्ट आहे. तोफत दारुगोळा जर पूर्वी घातलेला नाही, तर नुसती रंजक कांहीं उपयोगी पडत नाही, एवढ्याचकरितां सत्यभामेचा आणि माधवरावाचा प्र. वेश आधी घालून मग माधवरावाने उडी टाकिली असे केले आहे. तो जो प्रसंग घातला आहे त्या प्रसंगी सत्यभामेने देखील निराशेत तेथन उडी टाकून प्राण देणे, आणि ते पाहून माधवरावाने उडी टाकणे हे जास्त चांगलें