पान:माधवनिधन.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झाले असते हे खरे, पण इतिहासांत तशी गोष्ट कोठे झालेली नाही, आणि सत्यभामेने आत्महत्या केल्यामुळे माधवरावाने आत्महत्या केली असा लोकांचा ग्रह होऊन याला इतिहासांत आधार काय, ह्मणून मागून प्रश्न निघतील ते होऊ नये ह्मणून तसे केले नाही. बलवंतराव नागनाथाला बाजीरावाच्या कारस्थानांत मदत करण्याला उद्युक्त करण्यास, आणि माधवरावाच्या पूर्वीच प्रबल झालेल्या मनोविकारांत भर घालण्यास या पात्राची योजना केली आहे. मैना, कोंडाजी आणि सत्यभामा ही पात्रे काल्पनिक. आहेत. बाकीची सर्व पात्र ऐतिहासिक आहेत. । नाटकाच्या संविधानकासंबंधाने भलताच ग्रह होऊ नये, व उगीच प्रश्न ऐतिहासिक मुद्यासंबंधाने निर्धू नयेत, आणि स्वतां ग्रंथकाराचे मुद्दे काय आहेत हे स्पष्टपणे कळावे ह्मणून ही एवढी प्रस्तावना लिहिणे भाग पडले. खाची लढाई झाल्यानंतर सवाईमाधवरावाच्या मृत्यूपर्यंतचा नाटकाचा काळ ह्मणने सुमारे सहासात महिन्याचा धरला आहे. नाटकांतील बहुतेक गोष्टी बखरीतूनच घेतल्या आहेत. इतक्या मुद्याच्या गोष्टी सांगून ही लांबलेली प्रस्तावना पुरी करतो. मु० पुणे, ता० । अनंत नारायण भागवत, १।२।१९०० ग्रंथकार. दुरस्ती:-नाटकपात्रांच्या यादीत ' बाजीराव पेशव्यांचा चुलतभाऊ असें आहे तेथे " चुलता" असें वाचावे.