पान:माधवनिधन.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

__ अक्टोबर १८९९] माधवनिधन. ७५ पहा श्रीमंत त्या कागदाकडे पाहून हांसत आहेत, यावरून स्वारी जरा खु. शीत आहे असे वाटते, पहावी खटपट करून ? ( पुढे होऊन हात जोडून ) माधव-(त्याच्याकडे पाहून ) या, या, तुह्मी ! असे हात कां जोडतां ? कोण तुह्मी ? पेशव्यांच्या कुलांत जन्म घेतल्याचा जर तुह्मी अपराध वेला असेल, तर तुमच्या हात जोडण्याचा येथे काही उपयोग व्हावयाचा नाही; त्याबद्दल तुमाला कडक शिक्षा झाल्याशिवाय कधी राहणार नाही. बाबूराव-मला श्रीमंतांनी ओळखिलं नाही वाटते ? मी या चरणाचा चाकर बाबूराव फडके ! माघव-काय ह्मणालात तुमी ? ते पुन्हां बोला पाहूं ? बाबूराव-मी श्रीमंतांच्या चरणांचा चाकर बाबूराव फडके ! श्रीमंतांची या सेवकाला काय आजा आहे ? ____ माधव-(तिरस्काराने आणि संतापाने ) 'श्रीमंतांची काय आजा आहे, मी या चरणाचा सेवक आहे,' या असल्या थट्टेखोरपणाचा मला अत्यंत संताप येतो. ही सर्व लबाडी आहे; आणि ही लबाडी करायला तुमाला कोणी शिकविली, किंवा तुमाला हिचे बाळकडूच पाजले आहे, अथवा तुझी सर्व त्या वृद्ध शिक्षकाच्या शाळेत शिकून तयार होऊन त्याचे पट्टशिष्य झाला आहांत ? बोला, बोला; आणि जे बोलाल तें खरें बोला. कोणापुढे बोलता याचा नीट विचार करा, आणि मग उत्तर द्या. जर खोटं बोललांत तर माझ्याशी गांठ आहे; चाकर असाल तर ते मला डोळ्यापुढे नकोत. त्यांचा शब्दही ऐकायला नको. कारण जो सेवक असतो, त्याला धनी होण्याची इच्छा होते. तेव्हां धनी होणारे चाकर आणि चाकराचे चाकर होणारे धनी मला नकोत. नुसता बाबूराव असेल तर मात्र मला माधवाला पाहिजे. कारण तो माझा जिवलग मित्र. तेव्हां तुह्मी कोण आहांत ते बोला; आणि बोलतांना असे हात जोडू नका.. बाबूराव-[ आपल्याशी ] श्रीमंतांना आता काय उत्तर द्यावें ! माधव-बोलता की नाही ? बाबूराव-श्रीमंत मला जो करतील तो मी होईन.