पान:माधवनिधन.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ हिले पाहिजे. अगदी दूर-जाऊन राहिले पाहिजे. [ दुसऱ्या बाजूला जातो.] . नाना-( आपल्याशी ) श्रीमंतांना अजून माझ्या बोलण्याचा खरेपणा वाटत नाही, त्याला माझा नाईलाज आहे. माझ प्रारब्ध ह्मणायचे, दुसरे काय? [ रागानें ] हरामखोरा, अधमाधमा, बलवंतरावा, तुझ्या एका दुष्ट कृतीमुळे हे सर्व झाले आहे. तुझ्या अपराधाबद्दल तुला झाली ही शिक्षा अगदी कमी आहे. त्या बाजीरावाने, वडिलोपार्जित जिन्नस ह्मणून जाने भरून तो ताईत श्रीमंतांकडे पाठविला, नानात-हेची पत्रे, निरोप पाठविले, त्यामुळेच श्रीमंतांच्या बुद्धिला भ्रंश झाला. तो ताईत जादूचा आहे असे मी कितीही आता जीव तोडून सांगितले तरी श्रीमंतांना ते कधीही खरे वाटायचं नाही. असो प्राणांत होईपर्यंत श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या वंशवृक्षाचे रक्षण करणं हे भानूच्या वंशांतील पुरुषाचे कर्तव्यकर्मच आहे. [ जातो.] प्रवेश तिसरा. सरा. स्थळ-गणेशमहालांतील दुसरें दालन. पात्रे-श्रीमंत माधवराव पेशवे हातांत पत्र घेऊन उभे आहेत तो बाबूराव फडके येतात.. बाबूराव - [आपल्याशी ] नानांनी सांगितल्याप्रमाणे श्रीमंतांची वृत्ती, बाजीरावाशी त्यांचा असलेला पत्रव्यवहार नानांला कळल्यापासून आणि त्यांनी बलवंतरावाला कैदेत टाकल्यापासून, अगदी बदलून गेली आहे. त्याचा नो पूर्वीचा आनंद, काम करण्याचा उत्साह, मनाचा मोकळेपणा यापैका आतां कांहीएक राहिले नाही. जेव्हां पहावी तेव्हां स्वारी विचारांत गक असत. 'तूं त्याच्या बरोबरीचा आहेस, त्यांचा मित्र आहेस, तुझ्याशी ते कदाचित् मोकळे मनाने बोलतील तेव्हां कसेंही करून, त्यांच्या मनांत काय आहे त काढून घेण्याची व त्यांची वृत्ती ताळ्यावर आणण्याची खटपट कर;' ह्मणून नानांनी मला सांगितले आहे, पण मी तरी येथे काय करावे? ते माझ्याशी तरी कुठे नीट बोलतात. त्यामुळे मलाही अगदी सुचेनासे झाले आहे. ते