पान:माधवनिधन.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अक्टोबर १८९९] माधवनिधन. बंदोबस्त आधी करावा लागत आहे; ह्मणून श्रीमंतांच्या मर्जीविरूद्ध कांहीं गोष्टी होत असतील, त्याची श्रीमंतांनी क्षमा केली पाहिजे. या सर्व गोष्टी जर मी पार विसरून जाईन, तर मात्र तसे होणार नाही. पण त्या गोष्टी आणि श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी मजवर केलेले अनंत उपकार, हा म्हातारा नाना कधी कधी विसरणार नाही. मरणानंतर देखील या म्हाताऱ्याची ही जीर्ण व निर्जीव हाडें तें उपकार आपोआप बोलून उठतील. तेव्हां नानासाहेबांच्या वंशाकरितां, पेशव्यांच्या गादीकरितां, आणि या महाराष्ट्रराज्याकरितां त्याच्या हिताची प्रत्येक गोष्ट करणे हे माझें कर्तव्यकर्म आहे. ते जर मी केले नाही तर मी माझ्या उपकारकांचे उपकार विसरलों, त्यांच्या वंशजांशी विश्वासघात केला, त्यांच्याशी कृतघ्न झालों, महाराष्ट्रांशी बेइमानी केली, आणि त्याचे अनहित केले असें होईल. सरकारचे गादीचे आणि महाराष्ट्रराज्याचे जे हित ती माझी इच्छा, तो माझा धर्म, तो माझा स्वाथे, तीच माझी तपश्चर्या, तेच माझं जीवित पुरुषार्थ; सर्व काही जगांतील जे कांहीं ऐहिक आणि पारलौकिक कृत्य असेल तें तें आहे. त्याच्याशी या उतार वयांत जर हा नाना पराङ्मुख झाला, असे श्रीमंतांच्या नजरेस आले, तर हा अधमाधम पातकी मृत्यूच्याच शिक्षेस योग्य आहे, मग त्याची उपेक्षा करूं नये !! आपल्या राष्ट्राशी बेइमानी करणारा प्राणी जिवंत ठेवून करायचा काय ? आज साट वर्षांपर्यंत मी हेच केले आहे, आणि आणखी जे काही आयुष्याचे अवशेष दिवस राहिले असतील तितके दिवस तेच करण्याची इच्छा आहे. राज्यशकटाचे अवजड जू श्रीमंतांनी घेतले ह्मणजे मी मोकळा झालो. माधव-मोकळे कसें होतां येईल ? नाना-बाकी कोणतीही गोष्ट श्रीमंतांच्या मर्जीविरुद्ध करण्याची माझी इच्छा नाही. अशी दुष्ट बुद्धि जर मला उत्पन्न झाली तर हे शीर या चरणी ठेवलं आहे, हे लागलेच श्रीमंतांनी या जर्जर झालेल्या देहापासून वेगळे करावें, ह्मणजे या देहाची सार्थकता होईल. (पायावर डोके ठेवतो ). [डोळ्यांत आंसवें आणून ] बाकी माझं काय आहे, व मला करायचे काय ? - माधव-नको---तें नको. त नको. त्यापासून आपल्याला अलग रा