पान:माधवनिधन.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. वर्ष ७ दृष्टीस पडला; या गोष्टी श्रीमंतांच्या लक्षांत नाहीत असें मी कसें ह्मणूं ? सुजांस थोडक्यांत कळतं! माधव-( मान हालवून ) हो, [ आपल्याशी ] मला कळलं नव्हतंपण आतां कळू लागलं आहे. नाना-दादासाहेब आणि आनंदीबाईसाहेब, यांच्या गृहकलह विषाचा परिणाम किती भयंकर आहे, याचा त्यांना आणि सर्वांना पूर्ण अनुभव आल्यामुळे, आपल्या चुलत्यांनी आणि वडिलांनी त्यांचा चांगला बंदोबस्त केला. तशाही स्थितीत आपल्या वडिलांचा याच गणेशमहालांत, कारस्थाने करून त्या दुष्टांनी कशा भयंकर रीतीने वध केला, ही गोष्ट श्रीमंतांच्या स्मरणांतून जातां कामा नये? श्रीमंतांचें मन मोठे आहे, स्वभाव उदार आहे, त्यामुळे श्रीमंत ती मागची गोष्ट विसरतील; परंतु आपल्या चुलत्यांनी आणि वडिलांनी 'आपल्या वडिल मातुश्रीस जन्मभरपर्यंत प्रतिबंधांत ठेवले,' हे बाजीराव त्यांचा पुत्र कधी विसरणार नाही. सगळे जरी नाही, तरी आईबापाचे काही तरी गुण मुलांच्या अंगी जात्याच येतात. तो त्याप्रमाणे काही तरी कारस्थाने करील; अशी माझी जी पूर्वी कल्पना होती, ती बाजीरावाच्या सध्यांच्या कारस्थानानें खरी ठरली इतकेच नव्हे, तर त्याबद्दल माझी पूर्ण खात्री झाली आहे. कोण भयंकर कारस्थान तें! नको, त्याचा उच्चारच करणे नको! - माधव-[ एकीकडे ] खरे आहे. त्याचा उच्चार करूं नये हे बरें, असं मलाही वाटतं. नाना--या लहान वयांत जर त्यांचा एवढा प्रभाव, तर पुढे राव काय करतील कोण जाणे? जशाला तसेंच परमेश्वर फळ देत आहे. आपल्या आजोबांच्या कृपाछत्राखाली मी वाढलों आहे. त्यांनी माझं पोटच्या पुत्राप्रमाणे प्रेमाने लालनपालन केले आहे, मला वाढविले आहे, मागील सर्व गोष्टी माझ्या डोळ्यापुढे मूर्तिमंत उभ्या आहेत. सर्व भोगलेल्या दुःखाचें, प्रत्येक क्षणोक्षणीं स्मरण होऊन अंतःकरण फुट्न जात आहे; त्याची कारणे कोणची, त्याचे परिणाम काय झाले; या सर्व गोष्टींचा या म्हाताऱ्याला पूर्ण अनुभव आला आहे, मागील अनुभवावरून पुढील गोष्टी तर्काने जाणून त्याचा