पान:माधवनिधन.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अक्टोबर १८९९] माधवनिधन. आजा नाही. पण—( विचार केल्यासारखे करून ) पण-तरी-काय-पणही-कांही नाही. ( तोंड फिरवून बसतो.) नाना-बलवंतराव नागनाथाला फितुराबद्दल कडक शिक्षा केली, याबद्दल श्रीमंतांना माझ्या त्या दिवशींच्या बोलण्याने रोष आला असेल, तर तो रोष श्रीमंतांनी सोडावा आणि या पायाच्या चाकराला क्षमा करावी. पण माझी खात्री आहे की, झाल्या गोष्टीचा श्रीमंतांनी शांतपणे विचार केला तर त्याला जी शिक्षा झाली ती अगदी योग्य झाली, अशी श्रीमंतांचीही खात्री झाल्यावांचून राहणार नाही. एका फितुरी मनुष्याला जर मोकळा सोडला तर, तो राज्यांत चहूंकडे गोंधळ उडवून दिल्याशिवाय कधी राहणार नाही. तेव्हां सुव्यवस्थेकरितां कडक शिक्षा कित्येक बाबतीत कोणाचीही शिफारस न ऐकतां केलीच पाहिजे. पेशवे सरकारच्या कायद्याचे उल्लंघन जर त्यांच्याचकड़न होऊं लागलं, तर मग त्याचं महत्व कोण मानील ? तेव्हां पेशवे सरकारच्या महत्वाकरितां त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. एकाच्याच महत्वाकरितां नव्हेत. ( सुस्कारा टाकून ) श्रीमंत नानासाहेब पेशवे पानपतच्या अपजयामुळे कैलासवासी झाल्यानंतर, महाराष्ट्रवासी जनांच्या अफाट शोक समुद्रावर प्रतिकूळ दैवाच्या प्रचंड झंझावाताने भयंकर तुफाने होऊन, जेव्हां हैं महाराष्ट्र राज्यरूपी तारूं इकडे तिकडे हेलकावे खाऊं लागले व त्याला गृहकलह, आपसांतील दुही, निकट शत्रूची कारस्थाने वगैरे मोठमोठी छिद्रे पड़न ते ज्या वेळी अगदी बुडण्याच्या बेतांत आले होते; त्या वेळी त्या तशाही प्रसंगांतून श्रीमंतांच्या चुलत्यानी मोठ्या हुशारीने गृहकलहाखेरीज बाकी जर्व छिट्टै बुजवून ते तीराला आणण्याचा प्रयत्न केला होता; पण ते हुशार कर्णधार अकालींच मृत्युमुखी पडले. पुढे त्यांत राज्यतृष्णाग्नीने एकदम पेट घेऊन श्रीमंतांच्या वडिलांचा स्वाहा केला ! पुढे चहूंकडे बजबजपुरी कशी माजली, श्रीमंत लहान असतांना कसे घोर प्रसंग आले, आणि हे राज्य दोयांच्या भांडणाने तिसऱ्याच्या घशांत जाण्याची किती भयंकर वेळ आली होती! परंतु त्यावेळी कोणकोणच्या प्रयत्नाने सर्वही अरिष्ट-ढगांतून मराठ्यांचा पराक्रम-रवि पार पडून खड्याच्या लढाईच्यावेळी सर्वांप्स त्याचा प्रभाव कसा