पान:माधवनिधन.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला.. वर्ष ७ नाना-काय-ती-आज्ञा–व्हावी. माधव- ( चमत्कारिक मुद्रेनें ) आज्ञा-( मोठ्याने हांसतो.) आज्ञाकांहीं.. नाना-होय, श्रीमंताची आज्ञा आमाला शिरसावंद्य होय! माधव-(एकीकडे तोंड करून बसतो आणि आपल्याशी) आपण दु: सऱ्याची आज्ञा विचारणं ह्मणजे, 'अशी आज्ञा आहे' ? असं सांगणं! ह्मणजे ही आज्ञा शब्दाची आणि त्याच्या अर्थाची थट्टा करणं आहे. तेव्हां (रागाने) मनुष्याची थट्टा, अधिकाराची थट्टा, हुकुमाची थट्टा, शब्दाच्या अथाची देखील थट्टा, हे काय आहे काय ? असली थट्टा श्रीमंत पंतप्रधान सवाई माधवराव पेशव्याला कधीं खपायची ( नानाकडे पाहून, उघड ) नाही. नाना-[ आपल्याशी ] या पूर्वी जेव्हा जेव्हा मी श्रीमंतांकडे येत असे, तेव्हां तेव्हां, श्रीमंत माझ्याशी किती मोकळ्या मनाने बोलत असत, मला किती नानात-हेच्या गोष्टी रोज विचारीत असत; त्यापैकी आतां एकही राहिलं नाही. धड बोलणं नाहीं, विचारणं नाहीं, दरबारांत येणं नाही, काही नाही. रोज आपली उदासीन वृत्ती असते. हे असं जर रोज चाललं तर कस होणार ? चोरानं चोरी केली, अथवा हरामखोरानं हरामखोरी केली ह्मणजे त्याबद्दल इतकं वाईट वाटत नाही, आणि त्या मनुष्याबद्दल इतका रागही येत नाही; पण इमानदाराने चोरी केली आणि अत्यंत विश्वासूक मनुष्यान विश्वासघात केला ह्मणने किती राग येतो, याची कल्पनाच होत नाही. बलवंतराव नागनाथाने तसे कृत्य केलं, आणि त्याबद्दल श्रीमंतांनी शिफारस केली ह्मणून रागाच्या आवेशामुळे, बोलण्यांत माझ्या हातून त्यावेळी अतिक्रम झाल्याने श्रीमंतांस राग येऊन अशी त्यांची वृत्ती झाली असेल तर, ती मला त्यांच्यापाशी क्षमा मागून घालविली पाहिजे. धन्यापुढे अपराधाची क्षमा माः गायला हरकत कसली ! ( उघड ) आतांशा श्रीमंतांनी उदासीनवृत्ता का धरली, त्याचं कारण जर समजेल तर त्याचे तात्काल निराकरण होइल । फक्त आज्ञा मात्र व्हावी! माधव-काय-आजा-आजा कसली? आणि कोणाची-माझी-काहा एक