पान:माधवनिधन.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अक्टोबर १८९९) माधवनिधन. त्याची मूळची स्थिती मगजे निरुपयोगी आणि निर्जीव लांकडाची ! लांकड तरी निरुपयोगी कां ? नाही, तें उपयोगी आहे. ते जर मुळीच नसतं, तर सुरेख आणि गोड शब्द काढणारं बाहुलं झालं असतं का? तेव्हां तें उपयोगीही आहे आणि निरुपयोगीही आहे. उपयोगी दुसऱ्याला आणि निरुपयोगी स्वताला ! ज्या पेशव्यांनी शेकडों वेळ निजामाची खोड मोडली, कित्येक वेळां हैदरनाईकाची आणि टिपू सुलतानाची रग निरविली, दक्षिण देशांत व-हाडांत, बंगाल्यांत, पंजाबांत, उत्तर हिंदुस्थानांत, गुजराथेत वगैरे सर्व ठिकाणी आपला अंमल, तरवार बहादर आणि विजयी अशा आपल्या सरदारांकडून बसवून, दिल्लीच्या बादशहापासून सुद्धां चौथ आणि सरदेशमुखीच्या सनदा आणल्या आणि छत्रपतींच्या नावाचा दरारा बसविला; रोहिले, गिलचे, व दुराणी लोकांना अटकेच्यापार हांकून दिले. त्या पेशव्यांचा गादीवर बसलेला मी माधवराव पेशवा आहे. पेशव्यांचा हुकूम मोडण्याची कोणाची छाती आहे; जो असे करण्याला धजेल तो मातीस मिळून जाऊन जन्मास आला होता की, नाही अशी त्याची स्थिती होऊन जाईल; पण माझा, माधवरावाचा हुकूम, पेशव्यांचा चाकर तर मानीत नाहीच, पण त्याचाही यःकचित् चाकरही मानीत नाहीं ! ह्मणजे मी प्रत्येक वस्तप्रमाणे उपयोगी आहे आणि निरुपयोगीही आहे. माधवराव पेशव्याचे सर्वजण ऐकतात, पण माझं ह्मणजे माधवरावाचे कोणीच ऐकत नाही. प्रत्येक गोष्टीचा त्यामुळे उपयोग आहे, पण तिचा स्वताला मात्र काही उपयोग नाही. अशा मनुष्याच्या स्थितीला हांसावं की रडावं ? ( दांत चांवून ) करावं तरी काय ! पण मला हांसतां येत नाही आणि रडताही येत नाही. कारण कोणतंही काम स्वतंत्रतेने मला करण्याचा अधिकार नाही, तेव्हां मी काय करावं, हे मला समोरून येणारे गृहस्थ सांगतील काय-हो (इतक्यांत नाना फडणवीस येतात.) नाना--(हात जोडून ) काय, श्रीमंतांची काय आज्ञा आहे ? श्रीमंतांनी येथे बसावं ? माधव-हो-बसलंच पाहिजे. (गादीवर जाऊन खिन्न वदनाने बसतो.)