पान:माधवनिधन.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ का प्रवेश दुसरा. स्थळ-गणेशमहाल. पात्रे-श्रीमंत सवाई माधवराव पेशवे, इकडे तिकडे विचारांत गर्क IR होऊन खेपा घालीत आहेत. माधव-[ आपल्याशी खिन्न वदनानें ] मी कोण ? आणि माझा जगात उपयोग काय; या दोन गोष्टींचा मी आज बरेच दिवस विचार करीत आहे, पण समाधानकारक असा याचा उलगडाच होत नाही. वाटेल तेव्हां म्यानातून काढावी, वाटेल तेव्हा तिचा उपयोग करून घ्यावा, आणि वाटेल तेव्हां ती म्यानांत घालावी; अशी भी एक मोठी पेशव्यांच्या अमोल्य वस्तुंपैकी सतेज आणि पाणीदार, रत्नखचित मुठीची आणि म्यानावर जडावाचं काम केलेली पण उपयोगी तरकार आहे; पण ती उपयोगी केव्हां, जेव्हां दुसरा कोणी तिचा उपयोग करील तेव्हां; तिचा स्वताला मात्र काही एक उपयोग नाही. तेव्हां मी सतेन आणि रत्नखचित मुठीची तरवार आहे खरा; पण ती पाणीदार नाही, दिखाऊ आहे. नाहीतर ' बलवंतराव नागनाथ कैदेत जातां कामा नये, बाबासाहेबाकडून वडिलांच्या जिन्नसापैकी, मला आलेला भेटीचा ताईत, माझ्याजवळ पाहिजे,' असा मी माधवराव पेशव्याने तीन वेळ कडक हुकूम सोडला असता, तो जेव्हां अमलांत आला नाहीं; तेव्हां तो पेशव्याचा हुकुम, तोडणाऱ्याचे लागलेच तिने तेथल्या तेथेच तुकडे तुकडे करून, पेशव्यांच्या पाणीदार समशेरीचे पाणी दाखविले असते! पण तसं कुठं झालं. बलवंतराव कैदेत गेला, तो माझा ताईत माझ्या जवळ आला नाही, आणि पेशव्यांचा हुकूम तोडला गेला तो गेलाच ! पण तो पेशव्यांच्या कैदेत गेला, तेव्हां मी तसा आहे आणि नाहीही. अत्यंत कुशल कारागिराने तयार केलेलं मी सुरेख, सुंदर आणि मधुर शब्द काढून लोकांचं मन आकर्षण करणारं असं एक कळसत्री बाहुलं आहे. पण ते सुरेख झालं केव्हां ? दुसऱ्यानं केलं तेव्हां ! ते कानाला गोड लागणारा सुस्वर आवाज काढतं केव्हां, दुसरा जेव्हां त्याची कळ फिरवितो तेव्हां ! या दोन्ही गोष्टींचा त्या कळसूत्री बाहुल्याला काही उपयोग आहे का, कांही नाही. ते सर्व दुसऱ्याचे उपयोगाकरितां ! स्वतां