पान:माधवनिधन.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- अक्टोबर १८९९] माधवनिधन. मैना-असल्या चहाडखोराबरोबर पाट लावून चहाडखोराची बायको, . असं मी नाही ह्मणून घेणार ? . ___ कोंडाजी—यडूळ तुला, जासूद, हलकारा, हुजऱ्या हवा होता. आन आतां सिपाई व्हवा व्हय! अग सटवे. कशी कशी बोलतीया मैना. (तिचा हात धरतो) मैना, असं कां करतीसग ? कवा, कवा मग बोल की ! __मैना-चल सोड मेल्या, मी तुझ्याशी पाट कधींच लावणार नाही. बाईसाहेबाना आज हरताळकेची पूजा करायची आहे, तेव्हां त्यांची वेणीफणी करून बागेतली माळ्याकडून फुलं आणायाची आहेत. सोड सोड मला जाऊंदे. ___कोंडाजी-[तिला धरून ठेवून ] तूं न्हाई, न्हाई, माझ्याशी पाट लावा यला कबूल होत ? ___मैना—नाही, नाहीं, चहाडखोराची कोण बायको व्हायला सुजलं आहे. माझा खेटर देखील आडला नाही. जल जा की चुगलखोरा ! [ झटक्याने निघून जाते.] कोंडाजी-[ आपल्याशी ] पांजरापोळांतली गाय जसी एका ठानावर बसून राहयची न्हाई, हाकडं जा, तकडं जा, इथं हुंग, तिथं त्वांड घाल अशी करती; तशांतल्या या बटकीच्या पोरी. असली ही चवचाल, आन चवना करनारी पाटाची नको आपल्याला बायकु ! आपन आपली लग्नाचीच एकादी फाकडी पोरगी पाहून बायकु करूं ! वाईच थोराड आन धडधाकट पोरगी पाहून केली मनजे झालं. बायकाला जरा चांगलं चांगलं खायला घातलं, जरा खुराक लावला मनजे भरारा उकीरड्यावानी वाढतात. सहा महिन्यांत माजलेल्या मशीवानी बायकु ! आपल्याजवल मुबलक पैसा असला मनजे हव्या तिकत्या एकाहून एक चढ फटाकड्या पाया पडत येतील. पैसा असला तर या पुन्यांत पोरीना काय तोटा पडलाय ? मेथीच्या भाजीवानी सस्त्याच सस्त्या. घटका दोन घटकांनी जीव जाऊन तिरडीवर नेऊन ठेवणाऱ्या जखड थेरड्याना सुधां बी जर फटाकड्या पोरी पैसाला मिलतात, जर मला जवान मला कां नाहीं मिलनार ? [ ऐटीने मिशाला पीळ घालीत निघून जातो. 7