पान:माधवनिधन.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ मैना-तसंच काही आहे ! कोंडाजी-काय त्ये कलंदे की ! कामाठ्याचा हलकारा, हलकाऱ्याचा जासूद, जासूदाचा हुजऱ्या, आन आतां हुजऱ्याचा नाईक झालों; आन इतकं समदं चार महिन्यांत. इतकी उच उडी डोंबारीबी मारत्यात कां ? मैना-तूं हुजऱ्याचा नाईक जो झालास तो कशानं ? कोंडाजी-माझ्या शेनपनानं, आणि अक्कलहुशारीनं सरकारची कामगिरी केली तवा झालो, कां उगीच झालों व्हय ? पाळत राखून नानासाबासनी गुपचुप खबार देऊन त्या शिवनेरीच्या पागेदाराला दिलाना पकडून, तवा नानासाबांची मेहेरनजर झाली. उगीच न्हव ? त्यो पडलाना आतां सिवनेरी किल्लयामधी अंधारकोठडीत कैदत ! त्ये समदं काम ह्या ह्या पठ्यानं केलं. मैना-कांहीं कुठं लढाईत तरवार तर गाजवली नाहींसना ? रांडासारखी चहाडी खाऊन त्या बामनाला कैदेत घालून वाढलास ! ही कामं तर रांडा, जे नामर्द असतात ते करतात ! थुः तुझ्या जिनगानीवर. लोकांच्या चहाड्या सांगन आणि नास करून, तळतळाट घेऊन मोठा होतोस ? लढाईत जाऊन तरवार गाजवायची होतीस, ह्मणजे मटलं असतं की खरं तझ्या अंगात पाणा आहे. पण ते येतं कुठलं! तूं बोलून चालून कामाठी केर काढणारा, तुझ्या अंगी मर्दपणा येणार कुठला! आधीं होता वाघ्या मग झाला पाग्या; पण त्याचा एळकोट कुठला जायला ! तशी तुझी गत ! कोंडाजी-आतां असं मनतीस व्हय ? पन तूं मला अगुदर सांग की पिरथीमीत जे समदं तालेवार होऊन ग्येलात, आन् मार टोलजंग वाड्यांत बसून बापाचा ल्योक, त्येचा ल्योक, त्याचा नातु, त्येचा पनतु असं पिढ्यान पिढ्या मजा मारत्यात; त्या समद्यानं तरवार गाजविली असती व्हय ? कनी तरवारवी गाजवतो, कुनी चहाडीबी करतो, कुनी दरोडाबी घालतो, कुनी कुनाचा गळाबी कापतो, असं काही जवा करत्यात तवा गबर होऊन बसतो. या पिरथीमीत एकाचा गळा दुसऱ्यानं कापल्याबगर कुनीच लेकाचा एकदम तालेवार होत नाही. समदं मर्द नसत्यात.