पान:माधवनिधन.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अक्टोबर १८९९]. माधवनिधन. मैना-[ हांसून ] घे पुन्हां ह्मणते, कोंड्या कामाठी, मसोबाराव, मसोबा, म्हसोबा ! कोंडाजी-(तिच्या तोंडावर हात ठेवून ) अग गप्प, गप्प! मैना—( हात काढून ) बघ, पुन्हां ह्मणते, ह्मसोबा, वाव्या, मसोबा, मसोबा ! काय करतोस तें कर आतां ! कोंडाजी-अग तुला समदं दावलं बी असतं, आन केलं बी असतं; पन तं जवा मनतीस तवा मला असा राग येतों की, तुला खूप बडव बडव बडवावी, आट्यावानी तिंबावी; पन तवा ह्मणतां ह्मणतां मधून मधून गालांत हांसतील आणि डोळे मिचकावतील, त्येनं माझा संमदा राग पान्यांत ढेकूळ टाकल्यावानी इरगुळून जातो. तूं मनतांना हांसू नकोस, आन डोळं बी मारूं नकोस, मनजे मग या मोचा क्रुद बघ कसा आहे त्यो, तुझा खीच करून टाकीन. मैना-( हांसून ) मेल्या कोंडाजी-( लघळपणाने ) बघ, बघ, पुन्हा गालांत हांसतीस, आन् डोळं बी मारतीस ! हे चांगलं नव्हं ! ( तिच्या जवळ जाऊन ) बरं आता तर या कोंडाजीरावाशी पाट लावशील कां न्हाई ? यो तुझ्यापरमानं मोठा झाला की न्हाई. तूं मागं ह्मणाली व्हतीस की मला कामाठी नग. जासूद, हुजय, शिपाई होवा, आन आतां बब की मी नुसता हुजन्य झालों नाहीं तर हुजऱ्यांचा नाईक झालो नाईक. आन तूं आतां माझ्याशी पाट लावलास की माझी कारभारीन होशील; आन मग वाड्यांतलं समदं लोक, समद्या बायका तुला नाईकीण मनतील नाईकीण ! कळलं कां! मग कवा पाट लावा. यचा ? या भादव्यांत, कां मार्गसिरांत, कां सिमग्यांत ! कां कवा ? बोल की सिमग्यापर्यंत थांबलं तर इतकं मायदळ दागिनं करूनशान तुझ्या अंगावर घालीन की, जनुकाय गौरच सजलीया ! पन इकतं लांब आपल्याच्यानं आतां न्हाई दम निघत ! भादव्यांतच घेऊं की उरकून ! दागिनं होतील मागून ! मैना-तुझ्याशी, मसोबाशी, मला मुळीच पाट लावायचा नाही. कोंडाजी-कां, कां आतां इचिबन् असं कां ?