पान:माधवनिधन.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्ष ७ ६४ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. आन बाकीच्यासनी नुसतं मुंडी हालवूनच सांगत जाईन. इतकी सर्व नानासाहेबाची कुरपा ! आन त्यांची कुरपा का होनार न्हाई, या बहादरानं तसीच सरकारची कामगिरी बजावली आहे. त्या सटवी मैनेचा नखरा माझ्या. पेक्षा आधीक आहे, का या कोंडाजी रावाची ऐट तिच्या नखऱ्याहून आधीक आहे ! लई, लई, फुटाण्यावानी उडत होती; बरं, बरं मैने सटवे (इतक्यांत मैना येते.) मैना-( मागून येऊन ) कायरे मेल्या ह्मसोबा, कोंड्या, कुणालारे सटवाई ह्मणतोस ? तुझी आई, बहीण, काकी, मावशी असेल सटवाई ! काय मेला नंदीबैलासारखा सजला पहा ? काय त्या पागोट्याची ऐट, काय अंगरख्याचा झोंक, कानांत वाळ्या काय घातल्या आहेत आणि मिशीला पीळ काय घालतो आहेस; जसा काय माकडाच्या तमाशांतला देवनी धसाड्याच! अहाहा शेणाचे दिवे ओवाळावे दिवे! मेल्या किती जरी नटलास, किती मुरकलास, किती जरी ऐट दाखविलीस तरी तुझ्या अंगाला जी केरपोत्येयाची घाण येते आहे, ती काही अद्याप गेली नाही. ओय-इश्यग बाईy! (थुकते.) कोंडाजी--( जरा रागाने ) ए ए फुटाणे, ए. मैने, जरा त्वांड संभाळ त्वांड ! कुनाला बोलतीस, याचं कांहीं गुमान है का तुला ? ह्या त्या करना घेऊन चौक झाडनारा आतां कोड्या कामाठी नव्हं समजलीस का : जाता ह्यो नानासाबाच्या मेहरबानगीनं शिरिमंतांच्या संमद्या हुजऱ्याचा काडानाराव नाईक आहे नाईक. जरा मानुस बनशानी बोलत जा. आता एकदा बोललीस त्ये बोललीस. पन्हा बोललीस तर बिलकुल खपनार नाही. हा लीच गारद्याच्या पहाऱ्यांत देईन. मैना-मेल्या मसोबाराव, तूं कां मला गारद्याच्या पहाऱ्यांत देणार : मुदाडाचे तोंड पाहून घ्या, मला गारद्याच्या पहाऱ्यांत देण्याचं ! कोडाजी-बघ, बघ, पुन्हा म्हनालीस ! न्हाई, न्हाई ह्ये खपनार बर, आता पुन्हां तर म्हन मनजे दावतो तुला !