पान:माधवनिधन.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सप्टेंबर १८९९] माधवनिधन.. अंक चवथा. प्रवेश पहिला. स्थळ-शनवारच्या वाड्यांतील चौक. पात्रे-कोंडाजी, नाईकाचा मोठा भपकेदार पोषाक करून ऐटीने येत आहे. कोंडाजी-( आपल्याशी ) आतां बयूं बरं मला कोण मुर्दाड कोंड्या कामाठी मनतो तो ! जो मनल त्याचं अगुदर तथच मुस्काट फिरवून देईन, आन् मग त्याच्याशी बोलन. इचिभन नशिब फळफळायला लागलं मनजे बघा की कसं फलफलतय ? चार महिन्यामागं मी या चौकांत क्येरपोत्यर करीत होतो, तो आतां समद्या हुजन्यांचा नाईक झालोया नाईक; आन् माझी नोकरीबी अक्षी शिरीमंताजवळ राहाण्याची. व त्यांच्यावर नजर ठेवण्याची नानासाबनी करून दिली. आतां समदं मला कसं वचकत्यात, आन् अक्षी कोंडाजीराव, कोंडाजीराव मनून शिरीमंत काय करत्यात, शिरीमंत कुठं हैती, नानासाब कचीरीत आलं कां ? त्यांची आतां भेट व्हईल. असं इ. च्यारत्यात, तवा मोहरं जातात. अगुदर जवा मी त्या इठ्याकडं, त्या महाद्याकडं, कामाकरितां जात व्होतो, तवा माझ्या अंगावर कसं कुत्रयावानी वसकन् येत होते, आन् आतां कसं माझ्या मोहरं कुत्रयावानं गोंडा घोल. त्यात. आतां मीवी त्यांच्यावर गुरगुरत जाईन. ( थोडे थांबून ) त्या समद्यासनी जाब देता देतां आपलं तर त्वांड दुखून आलं. त्या लोकासनी असं कसं समजत न्हाई मनतो की, इकत्या जनासनी ह्ये एकट्या कोंडाजीराव नाईकाचं थोबाड जाब देतां देतां दुखून कसं येत नसल. ह्ये माझं थोबड आहे का तोबरा आहे तोबरा ! पन दुसऱ्याची फिकीर या दुनियेत करतो कोन ल्योक ? ज्याची त्याची मोठ्याची काय, आन् लहानाची काय संमदी आपल्यावर नदर. आतां ह्यो कोंडाजीराव नाईक कुनासनी तोंडानं जाव नाहींच देनार ! नानासाव आन शिरमंत जेव्हां इच्यारतील तवाच ह्ये त्वोंड उघडल,