पान:माधवनिधन.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमा ला. वर्ष ७ श्रीमंतांजवळ माझी हात जोडून अशी विनंती आहे की, या बाबतींत श्रीमंतांनी अगदी भीड खर्च करूं नये, तिचा कांही एक उपयोग व्हावयाचा नाही. बलवंतराव नागनाथाला झाली ही शिक्षा अगदी योग्य झाली आणि त्याने ती भोगिलीच पाहिजे. आणखी श्रीमंतांजवळ माझी अशी विनंती आहे की, त्यांनी आजपासून असल्या भानगडीत सध्यां मुळीच न पडण्याचं व कोणतेंही कृत्य स्वतंत्रतेने न करण्याचं पूर्णपणे लक्षात ठेवावें. मी काय ह्मणों हैं श्रीमंतांच्या ध्यानात आले असेलच. माधव-हो,-हो--पूर्णपणे ध्यानांत आले, आणि पेशव्याचा अधिकार काय, हेही पूर्णपणे ध्यानात येऊन चुकलं. पेशव्याचा हुकूम तोड. णाऱ्या मनुष्याचे तुकडेच केले असते पण-(तें आंवरून रागाने निघून जातो) नाना-( रागानें ) त्या हरामखोराच्या दुष्ट कृतीमुळे हा असा आज दुःखदायक प्रसंग आला. श्रीमंतांना माझ्या बोलण्याचा सध्यां राग आला आहे, पण परिणामी ते त्यांना हितावह झाल्याशिवाय कधी राहणार नाही. दुष्ट कृत्य हे भयंकर महामारीसारख्या साथीच्या रोगाप्रमाणे आहे. ते एका मनुष्याचाच नाश करून रहात नाही, तर आसपासच्या कित्येकांच्या प्राणनाशास कारण होते. तेव्हां त्यापासून उपद्रव न होऊ देण्याची पहिल्यापासूनच काळजी घेतली पाहिजे. नानासाहेब पेशव्यांच्या सुवंश वृक्षाच्या या लहानशा सुंदर रोप्याला, या असल्या विषारी किडी लागू नयेत, त्यांची छाया सुद्धा यावर पडूं नये, ह्मणून मी रात्रंदिवस मोठ्या दक्षतेने जपत असतांही शेवटी ती लागण्याचा प्रसंग येऊन ठेपलाच होता; पण दैवयोगाने तो लवकरच दृष्टोत्पतीस आला ह्मणून बरे झाले. आतां मला श्रीमंतांच्या प्रत्येक कृतीवर पूर्वीपेक्षाही जास्त दक्षतेने याकरितां नजर ठेविली पाहिजे. कारण सर्पाच्या कुलांत सर्पच उत्पन्न व्हावयाचे, हे सर्व जगाला माहित आहे. कोणी तात्काळ प्राण घेणारे, कोणी पाव लहरीचे, कोणी अर्ध्या लहरीचे, कोणी एक लहरीचे, कोणी दोन तीन लहरीचे इतकाच त्यांच्यांत भेदाभेद; बाकी परिणामी सर्वच प्राणांशी गांठ घालणारे असतात. ( जातो.) अंक तिसरा समाप्त.