पान:माधवनिधन.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सप्टेंबर १८९९ माधवनिधन. आली पाहिजे. अन्यायाने एखाद्याला शिक्षा देण मला अगदी पसंत नाहीं; आणि माझी खात्री आहे की, त्याने काहीएक गुन्हा केला नाही. नाना-राजद्रोह केला, यापेक्षां आणखी त्याने कोणचा अपराध करायचा होता ? ( हात जोडून ) त्याबद्दल श्रीमंतांची खात्री झाली नसेल, पण माझी पूर्ण खात्री झाली आहे. मी सर्व प्रत्यक्ष आपल्या कानानी ऐकलें आहे. त्यानं फितरीपणा केला, त्याला सांगितलेली कामगिरी त्यानं उत्तम रितीनं बजाविली नाही, इतकंच नव्हे; पण त्याच्या तो उलट वागून त्याने विश्वासघात केला. विश्वासघातकी माणसें राज्याला अपायकारक असतात, याकरितां त्यांना कडक शिक्षा दिलीच पाहिजे. माधव-(संतापून ) पण त्याने विश्वासघात केला कुठे ? नाही-नाहीबम्स माझा हुकूम चालला पाहिजे. नाना-बाजीरावांशी गुप्तरितीने पत्र व्यवहार होऊ देणे, एकमेकांच्या भे. टी एकमेकांकडे पोहचविणे, मी सांगितले त्याच्या विरुद्ध गोष्टी चोरून करणे, या सर्व गोष्टी राजद्रोहाच्या नाहीत तर कशाच्या आहेत ? अशा गोष्टीला श्रीमंतांचे पाठबळ, आणि अशा फितुरी मनुष्याला सोडून देण्याबद्दल श्रीमंतांची शिफारस; यासारखी दुसरी दुःखदायक गोष्ट कोणची! शिव, शिव, हे मला मुळीच सहन होणार नाही. जोपर्यंत आपलं हिताहित कशांत आहे हैं समजत नाही, जे काम आपण करतो, त्याचा परिणाम पुढे काय होईल, हैं कळत नाहीं, जबाबदारी शिरावर घेण्याची शक्ति नाहीं, कोण मनुष्य कशा योग्यतेचा आहे, याची परीक्षा नाहीं, राज्याला अपाय कशाने आणि कसा होत आहे याची कल्पना नाहीं; तोपर्यंत कोणत्याही मनुष्याला स्वतंत्रतेनें कोणचेही काम करण्याला अधिकार नाही. त्यांतून लक्षावधी मनुष्यांचे बरे वाईट करण्याचें ज्यांच्या नुप्तत्या लहरीवर असते, त्यांना तर या गोष्टी चांगल्या रितीने समजू लागेपर्यंत, राज्याच्या फायद्याकरितां मुळीच करून देतां उपयोगी नाहीत. श्रीमंतांची सध्यां तशी स्थिती आहे व वयही लहान आहे, ह्मणून श्रीमंतांना कोणतीही गोष्ट आपल्या मर्जीप्रमाणे आणि स्वतंत्रतेने करितां येत नाही. तसे करण्याला अद्याप अवकाश आहे. याकरितां