पान:माधवनिधन.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ पाहून ] माझ्या आप्ताकडून मला आलेली वस्तु मी घेणार. (घेण्यास जातो पण नाना देत नाही.) नाना-[ रागानें ] राजद्रोहाच्या अपराधाबद्दल कोणाचीही शिफारस ऐकायची नाही व चालायचीही नाही. झाली ही शिक्षा योग्य आहे, आणि ती अंमलांत आलीच पाहिजे. ने माधव --( रागानें ) पण त्याला श्रीमंत पंतप्रधान माधवराव पेशव्याची संमती पाहिजे. नाना-पाहिजे, पण ती सध्यां नाही, आणि या कामांत चालायची नाही. चल ने-तोंड पहात काय उभा राहिला आहेस ? माधव-नाना, नाना-हा पेशव्याच्या हुकुमाचा उपमर्द होत आहे. नाना-कांही नाही. तसें खरोखरच होत आहे की काय हे मागून पहातां येईल; सध्या माझ्या हुकुमाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. ( कोंडाजी घेऊन जाऊं लागतो.) बलवंत-(जातां जातां ) फुटलं, नशिब फुटलं. श्रीमंतांच्या मध्यस्थीचा कांही उपयोग होईल असं वाटलं होतं, पण सर्व व्यर्थ. आतां मला जन्मपयंत कारागृहवासच भोगला पाहिजे. मी या भानगडीत पडलों नसतों तर बरं झालं असतं. भावीवैभवपदाच्या माझ्या मनोराज्याने काढलेल्या सुंदर इमारतीने माझे डोळे दिपून गेले, पण तिला जाण्याच्या रस्त्यावर मध्ये असलेले भयंकर खोल खळगे मला त्यावेळी दिसले नाहीत. त्यांतच मी पडलों. यांतन बाहेर निघण्याची आतां मुळीच आशा नको. दुर्दैव ओढवलं ह्मणून मला त्या दिवशी प्रथम या कामांत पडण्याची बुद्धि झाली. प्रिये सत्यभामे, आतां तुझं आणि तुझ्या तानुल्याचें कसं होईल. ( जातो.) नाना-चला, आतां दुःख करून काय उपयोग ? माधव मागून नाही. आतां नाना--बलवंतराव नागनाथ कैदैत जातां कामा नये. त्यांनी राजद्रोह केला नाही. त्यांनी जर तो खरोखर केला असेल तर त्याला ती शिक्षा होणं योग्य आहे, त्याच्या अपराधाची चौकशी