पान:माधवनिधन.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सप्टेंबर १८९९] माधवनिधन. बलवंत-मी-कांहीं-एक फितुरीपणा केला नाही. नाना-चोरून एकमेकांकडे पत्रे यायची, भेटीच्या जिन्नसा यायच्या, आणि त्या तुझ्या मार्फत, ज्याला मी बंदोबस्ताकरितां नेमला त्या कामगारामाफत अं? हा फितूर नाही तर काय? याकरितां तुला तेथे ठेवला होता अं! बलवंत-माझ्या-- नाना--[ संतापाने ] अगदी एक अक्षर बोलू नकोस? माझ्या विश्वासाचे जसें तूं मला फळ दिलेस, तसे आपल्या राजद्रोहाच्या कृतीचे फळही आतां भोगायला तयार हो. राजद्रोहाच्या अपराधाबद्दल कड्यावरून लोटणे, हत्तीच्यापायीं देणे, अगर सूळावर देणे, यापैकी देहांतच शिक्षा दिली पाहिजे; पण तूं ब्राह्मण पडलास ह्मणून तुला ती शिक्षा देत नाही, परंतु जन्मभरपर्यंत तुला किल्ल्याच्या अंधारकोठडीत कैदैतच मेलं पाहिजे. कोंडाजी, याला असाच खाली घेऊन जा, आणि गारद्याच्या पहाऱ्यांत दे; मी खाली आलो झणजे याची आणखी काय तजवीज करायची ती करतो. ने-ने-. ओढ-त्याला माझ्या डोळ्यांपुढून ओढ. हा अधम, राजद्रोही एक क्षणभर देखील आतां माझ्या दृष्टीपुढे नको. कोंडाजी-चला-( त्याला खेचून पुढे करूं लागतो.) बलवंत-( काकुळती येऊन ) नाना--साहेब-- नाना--[ तिरस्काराने ] हो, तुला बाजीरावाचे चरण सोडण्याची इच्छा नाहींना ? तेथेच त्यांच्याजवळ तुझी स्थापना करतों ! ह्मणने बाजीरावालाही असली कुलंगडी, आणि कारस्थानं उत्पन्न केल्याबद्दलचं प्रायःश्चित् कसं भोगावं लागते, तें तूं त्यांच्या नेहमी डोळ्यासमोर असला ह्मणजे चागलं कळेल. याच्या पायांत मोठ्या वजनदार शृंखळा घालून, याला शिवनेरी किल्यावर आतां पाठवायचा आहे; तेव्हां याच्या बरोबर जाण्याकरितां पहारा तयार ठेवण्यास जमादारास माझा हुकूम सांग. चल ने. माधव-[पुढे होऊन रागानें ] कोंडाजी, खबरदार त्याला घेऊन गेलास तर. सोड त्याच्या मुसक्या. [ कोंडाजी नानाकडे आणि पेशव्याकडे पहात रहातो ] तोंड काय पहातोस. तुला कोण हुकूम करीत आहे ? [ नानाकडे