पान:माधवनिधन.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[वर्ष ७ च्या लीच आप्त वाय विचा त्याच -रच्या - पांख त्याच तेव्हां कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. माधव-(पत्र पहात रहातो ) बाबा(बलवंतराव नागनाथ बाहेर पडतात, तो एकदम नाना फडणवीस पुढे होऊन ओरडून ह्मणतात; माधवराव त्यांचे ओरडणें ऐ कून स्तब्ध होतो.) नाना-[ रागाने, मोठ्याने ओरडून ] बलवंतराव कुठं चाललास. उभा रहा. खबरदार एक पाऊल पुढे टाकशील तर. बलवंत-(घाबरून लटलटा कांपू लागतो.) नाना-आतां श्रीमंतांजवळून उचलून तूं काय खिशांत घातलेंस, ते - काढ पाहूं! बलवंत-का-ही-ना-ही नाना--कांही नाही. मी आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. कोंडाजी, पहातोस काय ? याच्याच शेल्याने बांध याच्या मुसक्या आणि पहा याच्या खिशांत काय आहे तें! [कोंडाजी बलवंतरावाच्या मुसक्या बांधतो आणि त्याच्या खिशां तून ताईत काढून घेतो. ] कोंडाजी--( नानांच्या हाती ताईत देऊन ) हे घ्यावं धनीसाहेब. दुसरं कागुद आहीत कागुद. नाना-अरे चोरा, हरामखोरा हे रे काय ! कांहीं नाहींना ? [ नीट न्याहाळून पाहून] हा ताईत आहे. हा कोठून आणलास? बोलतोस की नाही? बलवंत-हा श्रीमंत बाजीरावसाहेब पेशवे यांनी श्रीमंतांस देण्याकरितां दिला आहे. श्रीमंत दादासाहेब यांच्या हातांतला तो आहे, आणि तो श्रीमंतांस नजर केला आहे. नाना–समजलों, समजलों, सर्व तुमचं आणि त्यांचे कारस्थान ! अरे फितु या हरामखोरा, तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला त्याचे हे फळ काय ? खास, खास, हा ताईत काही चांगला नसावा. तूं इनका राजद्रोही होशील असे मला मुळी सुद्धा वाटलं नव्हतं. राजद्रोह, फितूर, बेइमानी चहूंकडे माजली आहे. अररे सोडी लागत -इच्छा लाइत _बांधून मा द्यावा, कसा